⚡सावंतवाडी ता.२०-: माजी आमदार परशुराम जीजी उपरकर आज सावंतवाडी दौऱ्यावर असता सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची भेट झाली. यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला 1983 शिवसेनेचा भगवा सप्ताह ते 1990 पर्यंतचे शिवसैनिक व तत्कालीन पदाधिकारी यांचा लवकरच स्नेह मेळावा करण्यासंदर्भात माजी आमदार जीजी उपरकर व माजी नगराध्यक्ष साळगावकर व माजी नगरसेवक उमेश कोरगावकर यांच्यात ह्या भेटीदरम्यान चर्चा झाली.
यावेळी तत्कालीन शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख यांची नियोजनासाठी बैठक आयोजित करण्याचे ठरले आणि लवकरच हा स्नेह मेळावा पक्षभेद विसरून जुने सहकारी म्हणून एकत्र येण्याचे ठरवले.
यावेळी सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग , माजी आमदार उपरकर समर्थक आशिष सुभेदार, आबा चीपकर , बाळा बहिरे, नाना सावंत, विजय गावडे, प्रणित तळकर आदि उपस्थित होते.
यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली….
