गणेशोत्सवातील सुव्यस्थेबाबत मालवण पोलीस निरीक्षकांचे ठाकरे शिवसेनेकडून अभिनंदन…!

⚡मालवण ता.२०-: गणेशोत्सव काळात मालवणात कायदा सुव्यवस्थेचे योग्य नियोजन केल्या बद्दल मालवण ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांची भेट घेत विशेष अभिनंदन केले.

मालवण शहराट गणेशोत्सव काळात गणपती आगमन व विसर्जन मार्गांवर पोलिसांकडून योग्य बंदोबस्त, गस्त तैनात ठेवण्यात आली. वाहतूक कोंडी होणार नाही याबाबतही चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात आले, असे सांगत ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन कौतुक केले. यावेळी शहर प्रमुख बाबी जोगी उपशहरप्रमुख उमेश मांजरेकर उपतालुका प्रमुख गणेश कुडाळकर वायरी सरपंच भगवान लुडबे, प्रसाद आडवणकर, युवासेना तालुकाप्रमुख मंदार ओरसकर, सिद्धेश मांजरेकर, करण खडपे, पियूष चव्हाण, सर्वेश लुडबे, मनीष आडकर, साहिल जाधव, अक्षय भोसले आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page