Headlines

Global Maharashtra Breaking News

गटाविकास अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर असगणी येथील संतोष राऊत यांचे उपोषण स्थगित…!

⚡मालवण ता.२३-: मगांराग्रारोहयो – महाराष्ट्र अंतर्गत मालवण तालुक्यातील असगणी कुस्थळवाडी ते तारभाटवाडी मुख्य रस्त्यास जोडणाऱ्या अपूर्ण रस्ता कामाची चौकशी करण्याबाबतची लेखी तक्रार असगणी येथील संतोष राऊत यांनी मालवण गटविकास अधिकारी आत्मज मोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करूनही अपेक्षित न्याय न मिळाल्याने संतोष राऊत यांनी पत्नी सोबत आज मालवण पंचायत समिती समोर उपोषण छेडले. दरम्यान, गटविकास अधिकारी यांनी…

Read Full News

स्वच्छ्ता अभियानात सिंधुदुर्गचा डंका, सलग दोन वर्षे प्रथम क्रमांक…

ओरोस ता.२३-: संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जिल्ह्यातील बापर्डे ग्रामपंचायत २०१९-२० मध्ये राज्यस्तरावर प्रथम, परुळेबाजार द्वितीय तर २०२०-२१ आणि २०२१-२२(एकत्रित अभियान) मध्ये परुळेबाजार राज्यात प्रथम आणि निरवडे ग्रामपंचायतला डॉ बाबासाहेब आंबेडकर पाणी गुणवत्ता हा विशेष पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारांचे वितरण सोमवारी छत्रपती संभाजीनगर येथे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडले….

Read Full News

प्राथमिक शाळांत सीसीटीव्ही बसवत ठेवला आदर्श…

⚡वैभववाडी ता.२३-: शाळा व्यवस्थापन समिती पालक व शिक्षकांच्या सहकार्याने वैभववाडी शहरातील दत्त विद्यामंदिर वैभववाडी नंबर 1 तालुका स्कूलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून जिल्ह्यासह तालुक्यात प्राथमिक शाळांमध्ये प्रथम सीसीटीव्ही बसवण्याचा मान दत्त विद्यामंदिर तालुका स्कूल वैभववाडी यांनी बसून एक आदर्श निर्माण केला. या उपक्रमाचे गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष…

Read Full News

नट वाचनालयाची सर्वसाधारण वार्षिक सभा शुक्रवारी…!

⚡बांदा ता.२३-: येथील ‘अ’ वर्गातील शतायु ग्रंथालय असलेल्या नट वाचनालयाच्या १३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन शुक्रवार दिनांक २७ रोजी सायंकाळी ३. ३० वाजता वाचनालयाच्या नाडकर्णी सभागृहात करण्यात आले आहे.या सभेत मागील वार्षिक सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, २०२३-२४ च्या जमाखर्चास मान्यता देणे, वार्षिक अहवाल मंजूर करणे, २०२४-२५ च्या अंदाजपत्रकास मान्यता देणे, आयत्यावेळच्या विषयांवर चर्चा…

Read Full News

घरातील भाग वापरावरून दोन कुटुंबात हाणामारी…

परस्पर विरोधी तक्रारीनुसार ७ जणांवर गुन्हे दाखल वेंगुर्ले.वेंगुर्ले तालुक्यात एक घरात रहाण्याबरोबरच व शौचालय वापरा संदर्भात असलेल्या वादातून दोन कुटुंबात झालेल्या वादात मारहाण झाली. या मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीनुसार परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. यात एकूण ७ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संदिप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल…

Read Full News

एसटी आरक्षणसाठी राज्यव्यापी आमरण उपोषणस वैभववाडी तालुका धनगर समाजाच्या जाहीर पाठिंबा…!

वैभववाडी प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्यात धनगर आरक्षणाचा भडका उडाला असून पंढरपूर येथे धनगर समाज बांधव आरक्षण अंमलबजावणी करिता उपोषण करीत आहेत या राज्यव्यापी उपोषणाला वैभववाडी तालुका समस्त धनगर समाज यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. वैभववाडी तालुक्यातील संभाजी चौक येथे बॅनर लावून हा पाठिंबा जाहीर करण्यात आला. यावेळी तहसीलदार कार्यालय येथे धनगर समाज एसटी अंमलबजावणी करिता निवेदन…

Read Full News

कांदळवन स्वच्छतेतून ३ टन कचरा संकलित…!

⚡वेंगुर्ला ता.२३-: ‘स्वच्छता ही सेवा‘ या पंधरवड्यानिमित्त वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे २२ सप्टेंबर रोजी वेंगुर्ला येथे कांदळवन स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. मांडवी खाडीमधील कांदळवनामध्ये जमा झालेले प्लास्टिक व इतर कचरा गोळा करून संपूर्ण मांडवी परिसराचीही स्वच्छता करण्यात आली. या स्वच्छतेमध्ये सुमारे ३ टन कचरा वर्गीकृत करून संकलित करण्यात आला. या मोहिमेत मुख्याधिकारी परितोष कंकाळ, स्वच्छता दूत डॉ.धनश्री…

Read Full News

सैनिक स्कूल आंबोलीच्या विद्यार्थ्यांची ज्युदो स्पर्धेत राज्यस्तरीय निवड…!

⚡सावंतवाडी ता.२३-: महाराष्ट्र जुदो असोसिएशन महाराष्ट्र, आयोजित 51 वी महाराष्ट्र जुनिअर आणि कॅडेट राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धा कासारडा येथे पार पडली. या स्पर्धेत सैनिक स्कूल, आंबोलीच्या विद्यार्थ्यांना नेत्र दिपक यश संपन्न झाले. यातील सहा विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय निवड झाली आहे.

Read Full News

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची जागतिक कृषी मंच ( WAF ) मंडळावर नियुक्ती…

⚡सावंतवाडी ता.२३-: मानवता विकास परीषद व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची जागतिक कृषी मंच( WAF ) मंडळावर नियुक्ती झाल्याबद्दल विशेष अभिनंदन केले आहे.याबद्दल बोलताना मानवता विकास परीषद व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत म्हणाले की जागतिक अन्न व…

Read Full News

तळगावमध्ये उबाठाला खिंडार…!

कार्यकर्ते भाजपमध्ये:निलेश राणे यांच्या उपस्थितीत केला भाजपमध्ये प्रवेश.. कुडाळ :माजी खासदार विनायक राऊत यांच्या तळगाव गावातील उपसरपंचसह उबाठा शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी व माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत कुडाळ येथील भाजप कार्यालय येथे प्रवेश केला या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे तळगाव गावातील उबाठा शिवसेनेला भगदाड पडले आहे.मालवण तालुक्यातील तळगाव येथील उबाठा शिवसेनेचे…

Read Full News

You cannot copy content of this page