वैभववाडी प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यात धनगर आरक्षणाचा भडका उडाला असून पंढरपूर येथे धनगर समाज बांधव आरक्षण अंमलबजावणी करिता उपोषण करीत आहेत या राज्यव्यापी उपोषणाला वैभववाडी तालुका समस्त धनगर समाज यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. वैभववाडी तालुक्यातील संभाजी चौक येथे बॅनर लावून हा पाठिंबा जाहीर करण्यात आला.
यावेळी तहसीलदार कार्यालय येथे धनगर समाज एसटी अंमलबजावणी करिता निवेदन देण्यात आले. यावेळी नवलराज काळे, लक्ष्मण शेळके, मीनाताई बोडके, संजय शेळके, गंगाराम शिंदे, गंगाराम भैरू अडूळकर, दाजी बर्गे,शामराव शेळके, मनोहर बोडेकर, धुळाजी काळे, विशाखा काळे,सुभाष अडूळकर, बयाजी गुरखे, भागोजी बाबू अडूळकर, कोंडीबा नारायण अडूळकर, धुळाजी भैरूअडूळकर, जनार्दन भैरु काळे व इतर समाज बांधव उपस्थित होते
