कांदळवन स्वच्छतेतून ३ टन कचरा संकलित…!

⚡वेंगुर्ला ता.२३-: ‘स्वच्छता ही सेवा‘ या पंधरवड्यानिमित्त वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे २२ सप्टेंबर रोजी वेंगुर्ला येथे कांदळवन स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. मांडवी खाडीमधील कांदळवनामध्ये जमा झालेले प्लास्टिक व इतर कचरा गोळा करून संपूर्ण मांडवी परिसराचीही स्वच्छता करण्यात आली. या स्वच्छतेमध्ये सुमारे ३ टन कचरा वर्गीकृत करून संकलित करण्यात आला.


या मोहिमेत मुख्याधिकारी परितोष कंकाळ, स्वच्छता दूत डॉ.धनश्री पाटील, स्वामिनी महिला बचत गटाच्या रोहिणी लोणे, रोट्रॅक्ट क्लबचे प्रितेश लाड, वेंगुर्ला नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी, बॅ.खर्डेकर महाविद्यालय व ग्रीन नेचन क्लबचे विद्यार्थी, स्वामिनी महिला बचत गटाच्या महिला व स्वच्छता प्रेमी तसेच नागरिकांनी सहभाग घेतला.
फोटोओळी-कांदळवनाच्या स्वच्छतेमध्ये तीन टन कचरा वर्गीकृत केला.

You cannot copy content of this page