परस्पर विरोधी तक्रारीनुसार ७ जणांवर गुन्हे दाखल
वेंगुर्ले.वेंगुर्ले तालुक्यात एक घरात रहाण्याबरोबरच व शौचालय वापरा संदर्भात असलेल्या वादातून दोन कुटुंबात झालेल्या वादात मारहाण झाली. या मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीनुसार परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. यात एकूण ७ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संदिप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल भगवान चव्हाण करीत आहेत.
