Headlines

Global Maharashtra Breaking News

मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रचाराचा उद्या सावंतवाडीत शुभारंभ…

⚡सावंतवाडी ता.०६-: महायुतीचे उमेदवार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रचाराचा उद्या गुरूवारी दु. १.३० वा. शुभारंभ होणार आहे. सावंतवाडीच आराध्य दैवत, श्री देव पाटेकर मंदीर येथे श्रीफळ ठेवून निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे. तसेच सावंतवाडीतील इतर देवदेवतांचे आशीर्वाद मंत्री दीपक केसरकर घेणार आहेत. पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार नितेश राणे हे उद्या सावंतवाडी दौऱ्यावर आहेत….

Read Full News

रविंद्र चव्हाण, नितेश राणे उद्या वेंगुर्ल्यात…

महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन.. वेंगुर्ला:शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी – आरपीआय महायुतीच्या सप्तसागर अपार्टमेंट येथील प्रचार कार्यालयाचे उदघाटन उद्या गुरुवार दिनांक ७ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर, आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी,…

Read Full News

दिपक केसरकर यांचे मताधिक्य वाढवण्यासाठी युवक फळीने नियोजनबध्द प्रयत्न करूया…

लखमराजे भोसले:वेंगुर्ले येथे युवा मोर्चा व युवासेना यांची समन्वयक बैठक संपन्न.. वेंगुर्ले : प्रतिनिधीशालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी या मतदार संघात करोडो रुपयांच्या निधीतून केलेली विकास कामे आहेत. यातील सिंधु-रत्न समृध्दीची कामे हि रोजगार व स्वयंरोजगाराची आहेत. त्यामुळे दिपकभाई निवडून येतीलच पण त्यांनी केलेल्या कामाची पोच मोठ्या मताधिक्याने देण्यासाठी युवक फळीने नियोजनातून आपापल्या भागातील…

Read Full News

“त्या” बॅनरचे खरे सूत्रधार राजन तेलींच…

संजू परब यांचा गंभीर आरोप: यापुढे एक जरी असा बॅनर दिसला तर तुम्हाला निवडणूक सोडून कणकवलीला जावे लागेल.. सावंतवाडी ता.०६-: दिपक केसरकर यांच्या विरोधात लावण्यात आलेले बॅनरचे खरे सुत्रदार राजन तेली आहेत असा आरोप शिवसेना जिल्हा संघटक संजू परब यांनी आज येथे केले.दरम्यान यापुढे जर या मतदारसंघात पुन्हा असे बॅनर दिसल्यास निवडणूक सोडून पुन्हा कणकवलीला…

Read Full News

कणकवली विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचाराचा तळेरे येथे भव्य शुभारंभ…!

⚡कणकवली ता.०६-: कणकवली विधानसभा मतदार संघाचे भाजप महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ बुधवारी मोठ्या उत्साहात करण्यात आला. श्री देव गांगेश्वर – खर्जादेवी मंदिर तळेरे येथे नारळ देवून करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांची उपस्थिती फार उल्लेखनीय होती. असंख्य कार्यकर्ते या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित होते.तळेरे येथील सर्व मानकरी मंडळी विश्वजीत तळेकर, उदय तळेकर, प्रवीण तळेकर,…

Read Full News

सावंतवाडी मतदारसंघात रामराज्य नाही तर रावण राज्य…

जयेंद्र परुळेकर; शिक्षणमंत्री असूनही केसरकरांनी काहीच केले नाही ⚡सावंतवाडी ता.०६-: महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात रामराज्य येणार अशी घोषणा करत असले तरी इथे मात्र रावण राज्य असल्याचा अनुभव येत आहे असा आरोप शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे चे नेते जयेंद्र परुळेकर यांनी केला आहे. यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की , गेले अडीच वर्ष…

Read Full News

सावंतवाडीत दीपक केसरकर यांच्या विरोधात पुन्हा एकदा बॅनरबाजी…

⚡सावंतवाडी ता.०६-: महायुतीचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघांचे उमेदवार आणि गेल्या तीन टर्म चे आमदार दीपक केसरकर यांच्या विरोधात गेल्या काही महिन्यांपासून बॅनर वॉर सुरू असून, त्यांच्या विरोधात अनेक बॅनर लाऊन विविध प्रश्नांचे जाब विचारत त्यांच्यावर टीका केली जात आहे. अशातच आज पुन्हा एकदा सावंतवाडी बसस्थानक परिसरात दीपक केसरकर यांच्या विरोधात बॅनर लाऊन अज्ञाताने जाब विचारला आहे….

Read Full News

नानिवडेत उबाठाच्या असंख्य कार्यकर्त्यांचा सेनेला अखेरचा जय महाराष्ट्र…

वैभववाडी प्रतिनिधी :तालुक्यातील नानिवडे येथील उबाठा सेनेचे शाखाप्रमुख दीपक साळवी, उपशाखाप्रमुख संतोष महाजन, ग्रामपंचायत सदस्य बाळकृष्ण साळवी, ग्रामपंचायत सदस्या प्रभावती महाजन यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. प्रवेश करणाऱ्यांमध्ये सुरेश साळवी, भिकाजी साळवी, तुकाराम गावडे, ऋषिकेश जाधव, बाळकृष्ण गोरूले, सखाराम शिवगण, प्रकाश महाजन, गोविंद वाडेकर, सार्थक महाजन व…

Read Full News

दोन दिवसांपूर्वी भाजपा मधून सुकळवाड येथून उबाठा गटात प्रवेश केलेले सुभाष म्हसकर पुन्हा स्वगृही…

⚡मालवण ता.०६-: वैभव नाईक यांनी दोन दिवसांपूर्वी सुकळवाड येथील श्री. सुभाष म्हैसकर यांचा उबाठा गटात पक्षप्रवेश दाखवला होता. यावर बोलताना कालच निलेश राणे यांनी सातत्याने होणाऱ्या या बोगस पक्षप्रवेशाचा पर्दाफाश केला होता. आज श्री. सुभाष म्हैसकर यांनी राणे साहेबांना भेटून आपली प्रतिक्रिया देत आपण व सुकळवाड येथील संपूर्ण ठाकर समाज हा राणे साहेबांसोबत असल्याची प्रतिक्रिया…

Read Full News

वेगळ्या वाटा निवडलेल्या आमच्या सहकाऱ्यांनी चार दिवसांत पुन्हा राष्ट्रवादीच्या प्रवाहात सामील व्हावं…

अमित सामंत:अर्चना घारेंवर जिल्हाध्यक्ष म्हणून मी कारवाई करू शकत नाही; त्याबाबत वरिष्ठ निर्णय घेतील.. सावंतवाडी : विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी मतदारसंघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजन तेली आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी श्री. तेली यांचा प्रचार करावा असे आदेश दिले आहेत. तसेच वेगळ्या वाटा निवडलेल्या आमच्या सहकाऱ्यांनी चार…

Read Full News

You cannot copy content of this page