जयेंद्र परुळेकर; शिक्षणमंत्री असूनही केसरकरांनी काहीच केले नाही
⚡सावंतवाडी ता.०६-: महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात रामराज्य येणार अशी घोषणा करत असले तरी इथे मात्र रावण राज्य असल्याचा अनुभव येत आहे असा आरोप शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे चे नेते जयेंद्र परुळेकर यांनी केला आहे.
यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की , गेले अडीच वर्ष शिक्षण मंत्री असूनही त्यांनी जिल्ह्यातील शाळांसाठी काहीही केले नाही, अनेक शाळा पटसंख्या अभावी बंद होण्याच्या मार्गावर आहेत. तर काही शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती करून त्यांना केवळ 8 हजार मानधन दिले जात आहे. तर कायमस्वरूपी असणाऱ्या शिपायाला 16 हजार मानधन मिळत आहे. हा शिक्षकांवर अन्याय आहे. असे मत त्यांनी व्यक्त केले. तर आजही अनेक रुग्णांना योग्य आरोग्य सुविधा मिळत नसल्याने गोवा बांबुळी वर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे जनतेची फसवणूक करणाऱ्या दीपक केसरकर यांचा या निवडणुकीला पराभव अटळ आहे. असे मत देखील जयेंद्र परुळेकर यांनी व्यक्त केले आहे.
