लखमराजे भोसले:वेंगुर्ले येथे युवा मोर्चा व युवासेना यांची समन्वयक बैठक संपन्न..
वेंगुर्ले : प्रतिनिधी
शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी या मतदार संघात करोडो रुपयांच्या निधीतून केलेली विकास कामे आहेत. यातील सिंधु-रत्न समृध्दीची कामे हि रोजगार व स्वयंरोजगाराची आहेत. त्यामुळे दिपकभाई निवडून येतीलच पण त्यांनी केलेल्या कामाची पोच मोठ्या मताधिक्याने देण्यासाठी युवक फळीने नियोजनातून आपापल्या भागातील घरोघरी जाऊन दिपकभाईंना होणारे मतदान वाढवा. असे प्रतिपादन सावंतवाडी संस्थानचे लखमराजे भोसले यांनी केले.
सावंतवाडी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना कार्यलय वेंगुर्ला येथे युवा मोर्चा व युवासेना यांची समन्वयक बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी युवा वर्गाने महायुतीचे काम एकजुटीने केलं पाहिजे यासाठी गावागावातून दौरा करून जास्तीत जास्त मताधिक्य कसे मिळेल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आदी बाबत मार्गदर्शन केले.
शिवसेना तालुकाध्यक्ष नितीन मांजरेकर यांनी दीपक भाई यांनी केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा देत महायुती चे काम युवा वर्गाने केले पाहिजे असे संबोधित केले. तर शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी महायुती आपली भक्कम असल्यामुळे आपण एकत्र रित्या काम करूया व 23 तारीखला विजयाचा जल्लोष करूया असे आवाहन केले. या वेळी व्यासपीठावर युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोसले, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, शिवसेना तालुकाध्यक्ष नितीन मांजरेकर, युवासेना जिल्हाध्यक्ष हर्षद डेरे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हेमंत गावडे, भूषण आंगचेकर, प्रसाद पाटकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रणव वायंगणकर, युवासेना तालुकाध्यक्ष स्वप्नील गावडे, युवा तालुका मोर्चा सरचिटणीस वैभव होडावडेकर, राहुल गावडे, युवासेना शहर अध्यक्ष सागर गावडे युवा तालुका संघटक विशाल राऊत, शहर संघटक उमेश आरोलकर तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
