Headlines

Global Maharashtra Breaking News

कुडाळला उद्यापासून मान्सून महोत्सव ; १४ वे वर्ष..

१५ रोजी वीरभक्त तरणीसेन, तर १६ रोजी रावण मंदोदरी विवाह:लाजरी क्रिकेट ग्रुपचे आयोजन.. कुडाळ : दशावतारातील दर्जेदार पौराणिक नाटकांची मेजवानी दशावतार नाट्य रसिकांना देणारा आणि सर्वांना उत्कंठा लागून राहिलेला कुडाळ येथील लाजरी क्रिकेट ग्रुपचा ‘मान्सून महोत्सव-२०२६ ‘ येथील सिद्धिविनायक सभागृहात १५ व १६ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचे हे चौदावे वर्ष आहे. यात…

Read Full News

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना: पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी प्रमाणपत्रांचे वाटप सुरू

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात १० शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वाटप ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१४-: शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’अंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांना कर्जमाफी देऊन दिलासा देण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला आहे. या योजनेनुसार कर्जमाफ झालेल्या शेतकऱ्यांना आता अधिकृतपणे ‘थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र’ वाटप करण्याच्या मोहिमेचा जिल्हा स्तरावर औपचारिक शुभारंभ करण्यात आला आहे. यामुळे…

Read Full News

​’हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जि. प. शाळा क्र. ४ च्या विद्यार्थ्यांची सावंतवाडीत उत्साहात रॅली…

⚡​सावंतवाडी ता.१४-:‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शाळा क्र. ४ च्या विद्यार्थ्यांनी सावंतवाडी शहरात भव्य आणि उत्साहपूर्ण तिरंगा रॅलीचे आयोजन केले. या रॅलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी देशप्रेमाचा संदेश देत संपूर्ण सावंतवाडी शहर राष्ट्रभक्तीच्या रंगात रंगवून टाकले.​शाळेच्या प्रांगणातून सुरू झालेली ही रॅली सावंतवाडी शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली. हातात डौलाने फडकणारा तिरंगा घेऊन विद्यार्थ्यांनी ‘भारत माता…

Read Full News

ऍड.अस्मिता सावंत भोसले यांना भोपाळ येथील सेज विद्यापीठातून डॉक्टरेट प्रदान…..

कायदेविषयक संशोधनाचा नवा अध्याय; किशोरवयीन गुन्हेगारीचा सखोल अभ्यास…. ⚡सावंतवाडी ता.१४-: श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा व अनुभवी विधिज्ञ ऍड.अस्मिता सावंत भोसले यांना भोपाळ येथील संजीव अग्रवाल ग्लोबल एज्युकेशनल युनिव्हर्सिटी अर्थात सेज विद्यापीठामार्फत कायदेविषयातील डॉक्टरेट अर्थात पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या या शैक्षणिक व संशोधनात्मक यशाबद्दल भोसले नॉलेज सिटी परिवारातून त्यांचे अभिनंदन होत…

Read Full News

वित्त विभागात एकही बिल प्रलंबित ठेवू नका…

संतोष साटविलकर:निधी वेळेत खर्च करण्यासाठी विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना.. सिंधुदुर्गनगरी ता १४नवीन आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेच्या कोणत्याही विभागाचे एकही बिल वित्त विभागात थांबणार नाही याची दक्षता घ्या .निधी वेळेत खर्च व्हावा या दृष्टीने समन्वयाने काम करा. प्रत्येक विभागाने याची खबरदारी घ्यावी. अशी सूचना आजच्या वित्त समिती सभेत सभापती संतोष साटविलकर यांनी केली. जिल्हा परिषद…

Read Full News

बांधकाम समिती सभा गाजली

बोगस सही प्रकरणातील कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी;: १७ गावांचा पाणीप्रश्न, बिलांच्या फायलींवरून सदस्य आक्रमक.. सिंधुदुर्गनगरी ता १४बांधकाम कार्यकारी अभियंत्यांच्या खोट्या सह्या करून आर्थिक घोटाळा करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई झाली; मग याच प्रकरणाशी संबंधित कर्मचाऱ्यावर अद्याप कारवाई का नाही? असा थेट सवाल उपस्थित करत जिल्हा परिषद सदस्य संदेश उर्फ गोटया सावंत यांनी प्रशासनाला आजच्या बांधकाम समिती सभेत चांगलेच…

Read Full News

ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे स्वागत

सुनिल भोगटे, समिल जळवी यांच्याकडून केंद्र सरकारचे आभार कुडाळ : ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे ओबीसी नेते तथा वैशवाणी समाजाचे जिल्हाध्यक्ष सुनिल भोगटे आणि भंडारी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष समिल जळवी यांनी स्वागत केले असून, हा निर्णय ओबीसी समाजासाठी ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.जनगणना प्रक्रियेला सुरुवात झाल्यापासूनच जातनिहाय जनगणना करण्याची मागणी…

Read Full News

कुडाळ तालुक्यातील १५६ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक..

जिल्ह्यात तालुका दुसऱ्या क्रमांकावर :प.स. सभेत विद्यार्थ्यांच्या अभिनंदनाचा ठराव.. ⚡कुडाळ ता.१४-: इयत्ता चौथी, पाचवी, सातवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात कुडाळ तालुक्यातील एकूण तब्बल १५६ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले असून पाच विद्यार्थी राज्यस्तर गुणवत्ता यादीत चमकले आहेत. या यशामुळे कुडाळ तालुका जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. इयत्ता निहाय गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांमध्ये चौथीचे २८,पाचवीचे ३९,…

Read Full News

पणदूरमध्ये महामार्गानजीक अंड्यांचा खच

कुडाळ : मुंबई गोवा महामार्गावरील पणदूरतिठा येथील ब्रीज नजिक महामार्गालगत मोठ्या प्रमाणात कोंबड्यांच्या अंड्यांचा खच पडल्याचे आज सकाळी निदर्शनास आले. कुडाळकडे जाताना पणदूर ब्रीज सोडल्यानंतर हि अंडी टाकण्यात आली आहेत. रस्त्यालगत एवढ्या मोठ्या प्रमाणात फुटलेली अंडी टाकण्यात आल्याने या प्रकाराबाबत स्थानिक ग्रामस्थ अनभिज्ञ आहेत. घटनास्थळी दुर्गंधी निर्माण होत आहे. अंडी वाहतूक करणा-या वाहनाला अपघात झाला…

Read Full News

माणगाव प्रा.आ. केंद्रात मे महिन्यापासून वीजच नाही..

प्रसूती, शस्त्रक्रिया ठप्प; पं.स. सभेत संतप्त सवाल:एसटी स्मार्ट कार्डपासून महावितरणच्या नुकसानभरपाईपर्यंत अनेक मुद्द्यांवर जोरदार चर्चा.. कुडाळ : आरोग्य व्यवस्थेला कोणतेही प्रशासन सर्वोच्च प्राधान्य देते. पण गेल्या मे महिन्यापासून माणगाव प्राथमिक केंद्रात वीजच नाही. त्यामुळे प्रसूती, लहानसहान शस्त्रक्रियाच होत नाहीयेत, या कडे आज झालेल्या पंचायत समितीच्या मासिक सभेत माणगावचे पंचायत समिती सदस्य योगेश धुरी यांनी लक्ष…

Read Full News

You cannot copy content of this page