Headlines

Global Maharashtra Breaking News

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशाचा संकल्प करावा…

सुनील राऊळ:संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त कुणकेरी विद्यालयात पर्यावरण संवर्धन व करिअर मार्गदर्शन; विद्यार्थ्यांना १०० सुपारी रोपांचे वाटप.. ⚡सावंतवाडी, ता. २०-: विद्यार्थ्यांनी स्वतःला कधीही कमजोर समजू नये. आपल्यामध्ये काहीतरी करण्याची जिद्द आहे, असा आत्मविश्वास बाळगून दहावी-बारावीच्या काळातच भविष्यात काय करायचे, याचा संकल्प करावा. ध्येय निश्चित करून त्या दिशेने सातत्याने वाटचाल केल्यास विद्यार्थी भविष्यात यशाचे शिलेदार बनतील,…

Read Full News

गणेशोत्सवापूर्वी बाजारपेठेतील रस्त्यांची डागडुजी…

दोन दिवस मुख्य बाजारपेठेतील वाहतूक बंद; नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांनी केली कामाची पाहणी.. ⚡सावंतवाडी, ता. २०-: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य बाजारपेठेत होणारी नागरिकांची व व्यापाऱ्यांची गर्दी लक्षात घेऊन नगरपालिका प्रशासनाने रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम वेगाने सुरू असून, या कामासाठी दोन दिवस बाजारपेठेतील वाहतूक बंद ठेवण्यात…

Read Full News

कणकवलीतील मोकाट गुरे, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त होणार…

कणकवली : शहरातील मोकाट गुरे आणि भटक्या कुत्र्यांचा नागरिकांना होणारा उपद्रव लक्षात घेता कणकवली नगरपंचायतीने या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचे काम सुरू असून, लवकरच कुत्रे पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्याची मोहीम व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली. कणकवली येथील गोपुरी आश्रम येथे गोपुरी आश्रमच्या पदाधिकाऱ्यांची…

Read Full News

५९ व्या युवा महोत्सवात एस.आर.एम.महाविद्यालयाचे सुयश

कुडाळ : युवकांच्या सुप्त गुणांना चालना देण्यासाठी आणि व्यक्तिमत्त्व उंचावण्यासाठी युवा महोत्सवाचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. नेहमी प्रमाणे यावर्षीही संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवात एकोणीस विविध कलाप्रकारांत सहभाग घेऊन त्यापैकी अकरा कलाप्रकारांत प्राथमिक स्पर्धेत सुयश मिळवत मुंबई येथे संपन्न होणाऱ्या ५९ व्या युवा महोत्सवाची अंतिम फेरी गाठली आहे.यशवंतराव भोसले…

Read Full News

वडाचापाट हायस्कूलमध्ये ‘जागतिक छायाचित्रण दिन’ उत्साहात…

⚡मालवण,ता.२०-:छायाचित्रण ही केवळ एक कला नसून ते विज्ञानही आहे. सध्याच्या काळात फॅशन व मॉडेल फोटोग्राफी, वाइल्ड लाईफ व नेचर फोटोग्राफी, जर्नालिझम व डॉक्युमेंटरी, प्रॉडक्ट व अॅड फोटोग्राफी, फाईन आर्ट तसेच एरियल व ड्रोन फोटोग्राफी यांसारख्या विविध क्षेत्रांत करिअरच्या उत्तम संधी उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांनी करिअरच्या दृष्टीने या संधीचा उपयोग करावा असे प्रतिपादनश्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाटचे…

Read Full News

इको सेन्सिटिव्ह झोनमधून सावंतवाडी शहर वगळा..

पालिकेचा ठराव: लाकडी खेळणी, गंजीफाला युनेस्को सांस्कृतिक वारसा मानांकनासाठी प्रस्ताव; पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळविण्यासाठी पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा,नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले.. सावंतवाडी : इको सेन्सिटिव्ह झोनमधून सावंतवाडी शहर वगळावे यासाठी ठराव घेण्यात आला आहे‌‌. इको सेन्सिटिव्ह झोन लागू झाल्यास अनेक बंधन शहरावर येणार असल्याने हा ठराव घेण्यात आला असून तो शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. तसेच आयुष मंत्रालय ओपीडीसाठी इलेक्ट्रीसीटी,…

Read Full News

रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्गात ‘सेवा अभियान’

⚡सावंतवाडी, ता. २०-: भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रविंद्र दादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात सेवा अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून प्रलंबित विकासकामे व विविध समस्यांबाबतची निवेदने स्वीकारण्यात येणार आहेत. प्रलंबित कामांबाबतची निवेदने भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नावाने सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले…

Read Full News

संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त शेर्ले येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप…

⚡सावंतवाडी ता. २०-: शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्र शाळा क्रमांक १, शेर्ले येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांना खाऊ, वृक्षरोपे व ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच शाळेसाठी पंखा आणि भिंतीवरील घड्याळे देण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. वाढदिवसाचा खर्च केवळ उत्सवापुरता…

Read Full News

संदिप गावडे यांच्या माध्यमातून निरवडे ग्रामीण रुग्णालय येथे फुमिगेशंन मशीन प्रदान…

⚡सावंतवाडी ता.२०-: निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जन आरोग्य समितीची बैठक संदिप गावडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र निरवडे यांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी रुग्णाच्या सोयी साठी निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी फुमिगेशंन मशीन जिल्हापरिषद सदस्य संदिप गावडे यांच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देण्यात आली. सदर बैठकीस सावंतवाडी पंचायत समितीचे…

Read Full News

डीसीसी बँकेत ३२ शिपाई पदांची भरती…

जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य; २० ते ३० ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज:६ सप्टेंबरला सिंधुदुर्गात परीक्षा; बारावीय उत्तीर्णांना संधी.. ⚡ओरोस, ता. १९-: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या शिपाई पदाच्या ३२ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार असून, इच्छुकांना २० ते ३० ऑगस्टदरम्यान ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. पात्र…

Read Full News

You cannot copy content of this page