Headlines

Global Maharashtra Breaking News

महिला पोलिस क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

ओरोस ता ८जागतिक महिला दिनानिमित्त सिंधुदुर्ग पोलीस दलातील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या पाच षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा पोलिस परेड मैदानावर पार पडली. या स्पर्धेमध्ये गोल्डन ईगल्स संघ विजेता तर रॅपिड स्ट्रायकर्स या संघ उपविजेता ठरला. मालिकावीर आणि उत्कृष्ट फलंदाज म्हणून काशी पाटकर यांना तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून प्रतीक्षा कोरगावकर यांना सन्मानित…

Read Full News

उबाठा गटाचे सोनाळी गावचे सरपंचयांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश…

⚡वैभववाडी ता.०८-: उबाठा गटाचे सोनाळी गावचे सरपंच भीमराव भोसले तसेच ग्रामपंचायत सदस्य बाळकृष्ण बोभाटे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पालकमंत्री नितेश राणे यांनी सर्व प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये संतोष शेलार, जयवंत पवार, हरिचंद्र गुरव, सचिन कदम, प्रशांत कदम, राजेंद्र जाधव, सचिन भोसले, सुधीर जाधव व कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

Read Full News

रोटरी क्लब ऑफ वैभववाडी व माधवराव पवार विध्यालय कोकिसरे च्या वतीने महिलादिन साजरा…!

⚡वैभववाडी ता.०८-: रोटरी क्लब ऑफ वैभववाडी व माधवराव पवार विध्यालय कोकिसरे च्या वतीने महिलादिन साजरा करण्यात आला१५० विद्यार्थिनी,महिलांना मार्गदर्शन व सॅनिटरी पॅड चे वाटप करण्यात आले. रो.डॉ पावसकर मॅडम कणकवली व सौ चेंदवनकर क्लब फूड डिस्ट्रिक कोऑर्डीनेटर सिंधुदुर्ग यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रोटरी क्लब ऑफ वाडीचे प्रेसिडेंट प्रशांत गुळेकर , माधवराव पवार विद्यालयाचे मुख्याध्यापक कदम…

Read Full News

वैभववाडीत आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद…

⚡वैभववाडी ता.०८-: जागतिक महिला दिन व करूळ गावचे सुपुत्र माजी आमदार ए. पी. सावंत यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत करुळ व राजन पाटील आयुर्वेदिक हॉस्पिटल सांगुळवाडी यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबीर संपन्न झाले. या शिबिरात एकूण 85 रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच त्यांना आजाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी कृषी महाविद्यालयाचे संचालक संदीप पाटील, करुळ सरपंच…

Read Full News

मनसे कडून सावंतवाडीत ‘महीला दिन’ साजरा…

सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालय, महाविद्यालय आणि पोलीस स्टेशन मधील महीलांना पुष्पगुष्छ देऊन महीलांचा केला सन्मान… ⚡सावंतवाडी ता.०८-: महीला दिनाचा सर्वञ उत्साह सुरू असताना महीलांचा सन्मान करणे हे भाग्याचे कारण एक महीला भरपुर रूपानी नटलेली आहे आई , बहीण , बायको, मुलगी अजुन बरीच रूप घेऊन ती आयुष्यात जगत असते ती कधी हसते कधी रडते ती खडतर…

Read Full News

लहान पिढीमध्ये दशावतार रूजवण्याचा उपक्रम स्तुत्य…

प्रा.वैभव खानोलकर:चेन्दवणमध्ये जिल्हास्तरीय बालदशावतार स्पर्धेचे उदघाटन.. कुडाळ : दशावतार लोककला लहान पिढीमध्ये रूजवण्याचा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन प्रा.वैभव खानोलकर यांनी केले. जि.प.शाळा चेंदवण पडोशी अमृत महोत्सव वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त भव्य जिल्हास्तरीय बालदशावतार स्पर्धा उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात आई माऊली रंगमंच चेंदवण पडोशी येथे संपन्न झाला.यावेळी चेंदवण सरपंच वैभव चेंदवणकर, कमलाकर…

Read Full News

महिला दिनी भंडारी हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी काढली प्रभातफेरी..

⚡मालवण ता.०८-:समान हक्क समान संधी, महिलांना देऊया आघाडी… महिला म्हणजे प्रेरणा, महिला म्हणजे बदल… महिलांचा करू सन्मान, देश बनेल महान… अशा घोषणा देत मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल च्या विद्यार्थ्यांनी महिला दिनानिमित्त स्त्री शक्तीचा जागर करणारी प्रभातफेरी मालवण शहरातून काढली. यावेळी सहभागी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी फलक झळकवत आणि घोषणा देत नागरिकांमध्ये महिलांच्या हक्कांबाबत जनजागृती…

Read Full News

स्टार युनियन दायइची लाइफ इन्शुरन्स कंपनीतर्फे विद्यार्थिनीसाठी सॅनिटरी नॅपकिन वितरित…

कनेडी हायस्कुल पासून सुरुवात ; एक हजार नॅपकिन्सचे वाटप.. कुडाळ : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्टार युनियन दायइची लाइफ इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील ग्रामीण भागातील शाळांमधील मुलींना ५ हजार सॅनिटरी नॅपकिन्स वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात आज कनेडी हायस्कूल मध्ये करण्यात आली.कनेडी हायस्कूलमधील मुलींसाठी एक हजार सॅनिटरी नॅपकिन्स आजच्या दिनी शाळेचे…

Read Full News

बाल स्नेही’ पुरस्काराने सिंधुदुर्गच्या बाल कल्याण समितीचा गौरव…

कुडाळ : महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोगातर्फे दिला जाणारा 2024 चा बालस्नेही पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्हा बालकल्याण समितीला अलीकडेच मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. बालस्नेही कल्याण समिती या नामांकन प्रकारात कोकण विभागातून सिंधुदुर्ग जिल्हा बालकल्याण समितीला हा पुरस्कार मिळाला आहे. सिंधुदुर्ग बालकल्याण समितीचे अध्यक्ष ऍड. संदेश ताशेटे आणि त्यांचे सहकारी ऍड नम्रता नेवगी, माया रहाटे,…

Read Full News

काजू बोंडावर प्रकिया सुरू केल्यावर चांगला दर काजू बागायतदारांना मिळणार…

दीपक केसरकर:हाऊस बोटच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळणार.. ⚡सावंतवाडी ता.०८-: काजू बोंड संदर्भात झालेल्या ब्राझील दौऱ्यात नॉन डिस्क्लोझर करार करण्यात आला आहे‌. लवकरच त्या कंपनीचे एमडी व टीम भारतात येणार आहेत. येथील काजूची ते पहाणी करणार असून त्यानंतर काजू बोंडावर प्रकिया सुरू केल्यावर चांगला दर काजू बागायतदारांना मिळणार आहे. काजू शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडेल असा विश्वास…

Read Full News

You cannot copy content of this page