लहान पिढीमध्ये दशावतार रूजवण्याचा उपक्रम स्तुत्य…

प्रा.वैभव खानोलकर:चेन्दवणमध्ये जिल्हास्तरीय बालदशावतार स्पर्धेचे उदघाटन..

कुडाळ : दशावतार लोककला लहान पिढीमध्ये रूजवण्याचा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन प्रा.वैभव खानोलकर यांनी केले. जि.प.शाळा चेंदवण पडोशी अमृत महोत्सव वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त भव्य जिल्हास्तरीय बालदशावतार स्पर्धा उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात आई माऊली रंगमंच चेंदवण पडोशी येथे संपन्न झाला.
यावेळी चेंदवण सरपंच वैभव चेंदवणकर, कमलाकर शृंगारे, श्री देवी माऊली पाताळेश्वर वगैरे देवस्थान उपसमिती चेंदवण अध्यक्ष संजय परब, प्रमोद शृंगारे, देवेंद्र नाईक, शशिकांत चव्हाण, दिनेश आजगावकर, परिक्षक पपू नांदोसकर, भास्कर सामंत, विजय शृंगारे, नरेश मयेकर, पोलिसपाटील रामचंद्र पेडणेकर, सौ शुभश्री शृगारे, ग्रा.प.सदस्य सौ प्रणाली तेंडोलकर, सौ सुचिता पोयरेकर, प्रा.वैभव खानोलकर, धोंडू रेडकर, राजन कोरगावकर, प्रकाश तांबे, मुख्याध्यापक सचिन मदने, उपशिक्षक भालचंद्र आजगावकर आदी उपस्थित होते.
जि.प.शाळा चेंदवण पडोशी येथे कमलाकर शृंगारे व उत्तम शृंगारे यांचे योगदानातून भव्य आई माऊली रंगमंच उभारण्यात आला आहे, याचे उदघाटन चेंदवण सरपंच वैभव चेंदवणकर यांचेहस्ते करण्याते आले. यावेळी कमलाकर शृंगारे यांनी शालेय विद्यार्थ्यंना स्कूल बॅग प्रदान केल्या.
चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळाचे देवेंद्र नाईक ,चेंदवण सरपंच वैभव चेंदवणकर, ज्येष्ठ दशावतारी कलाकार भास्कर नाईक व पपू नांदोसकर, श्री देवी माऊली पाताळेश्वर वगैरे देवस्थान उपसमिती चेंदवण अध्यक्ष संजय परब , ग्रा.पं.सदस्य चेंदवण नारायण शृंगारे, दशावतार लोककला अभ्यासक प्रा.वैभव खानोलकर, प्रमोद शृंगारे, सोमदत्त इंडस्ट्रीजचे उद्योजक शशिकांत चव्हाण , एलआयसीचे दिनेश आजगावार आदी मान्यवरांचा विशेष सन्मान अमृत महोत्सव संयोजन समिती चेंदवण पडोशी कडून करण्यात आला.
जिल्हास्तरीय बालदशावतार नाट्य स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भावईदेवी बालदशावतार नाट्यमंडळ रांगणातुळसुली नं 1 यांनी सुधा खडगासूर, दुर्गादेवी बालदशावतार नाट्यमंडळ जि.प.शाळा कुणकावळे नं.1 ता मालवण यांनी युगे युगे कलियुगे, नवोदित बालदशावतार नाट्यमंडळ नेरूर माड्याचीवाडी ता.कुडाळ यांनी गणेश इच्छापूर्ती हि नाटके सादर केली.
कुडाळ पडतेवीडी शाळेचा इयत्ता तिसरीत विद्यार्थी कु.आरव आईर याचा झी मराठी वरील ड्रामा फायनलिस्ट झाल्याबद्दल सन्मानचिन्ह देवून विशेष सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन मुख्याध्यापक सचिन मदने तर आभार उपशिक्षक भालचंद्र आजगावकर यांनी केले.

You cannot copy content of this page