महिला दिनी भंडारी हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी काढली प्रभातफेरी..

⚡मालवण ता.०८-:
समान हक्क समान संधी, महिलांना देऊया आघाडी… महिला म्हणजे प्रेरणा, महिला म्हणजे बदल… महिलांचा करू सन्मान, देश बनेल महान… अशा घोषणा देत मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल च्या विद्यार्थ्यांनी महिला दिनानिमित्त स्त्री शक्तीचा जागर करणारी प्रभातफेरी मालवण शहरातून काढली. यावेळी सहभागी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी फलक झळकवत आणि घोषणा देत नागरिकांमध्ये महिलांच्या हक्कांबाबत जनजागृती केली.

यावेळी भंडारी हायस्कुलचे मुख्याध्यापक हणमंत तिवले, पर्यवेक्षक आर. डी. बनसोडे, शिक्षिका सौ. सरोज बांदेकर, श्रीमती चव्हाण, पी. जी. मेस्त्री, सौ. अस्मिता वाईरकर, पूजा कुडाळकर, सौ. रेवणकर, आदी व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page