Headlines

Global Maharashtra Breaking News

मालवण तालुकास्तरीय आयोजीत वाचक स्पर्धेमध्ये योगेश मुणगेकर प्रथम…!

⚡मालवण ता.०६-: मालवण येथील नगर वाचन मंदिर यांच्यावतीने साहित्यिक जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित मालवण तालुकास्तरीय वाचक स्पर्धेमध्ये योगेश रविंद्र मुणगेकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला. स्पर्धा आज ग्रंथालयाच्या सभागृहात झाली. व्यासपीठावर स्पर्धेचे परिक्षक विनायक कोळंबकर व संग्राम कासले व कार्यवाह नागेश कदम आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व श्री देवी…

Read More

शिरगाव- राकसघाटी येथे कारला गवारेड्याची जोरदार धडक…

कारचे मोठे नुकसान:शिरगाव परिसरातील ९ महिन्यातील पाचवी घटना.. ⚡देवगड ता.०६-: देवगड नांदगाव मार्गावरील शिरगाव- राकसघाटी येथे देवगडवरुन नांदगावकडे जाणा-या कारला गवारेड्याची जोरदार धडक बसल्याने कारचे मोठे नुकसान झाले आहे.हि घटना शुक्रवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. देवगड तालुक्यातील इळये येथील अभिषेक मिराशी हे ईनोव्हा कारने इळये येथून नांदगावकडे जात असताना शिरगाव राकसघाटी ( कापीचा चाळा)…

Read More

नट वाचनालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महपरिनिर्वाण दिन साजरा…

⚡बांदा ता.०६-: येथील नट वाचनालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महपरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष निलेश मोरजकर, कार्यवाह राकेश केसरकर, सहकार्यवाह हेमंत मोर्ये, संचालक प्रकाश पाणदरे, अंकुश माजगावकर, अनंत भाटे, प्रवीण परब, सौ….

Read More

पालघरमधील आदिवासी पाड्यातील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप…

⚡मालवण ता.०६:- मुंबई कांजूरमार्ग पूर्व येथील ‘एक सेवाभावी संस्था’ या संस्थेच्या वतीने पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांमध्ये बालदिन साजरा करण्यात आला. यामध्ये पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिलोंडा (चिंचपाडा) आणि चांभारशेत या आदिवासी पाड्यांमधील शाळांमधील सुमारे ३५० विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप, खाऊ व फराळचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला शशांक मंचेकर,…

Read More

सेंट्रल गव्हर्नमेंट पेन्शनर्स असोसिशनचा मालवण तालुकास्तरीय मेळावा संपन्न…!

⚡मालवण ता.०६-: सेंट्रल गव्हर्नमेंट पेन्शनर्स असोसिशनची मालवण तालुकास्तरीय वार्षिक मेळावा मालवण येथील नगर वाचन मंदिरच्या सभागृहात अध्यक्ष एस. ए. डिसोजा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. शासनाकडून अपेक्षित असलेल्या पेन्शन विषयक सुधारणा आणि त्याची अंमलबजावणी या मुख्य विषयावर या सभेत चर्चा करण्यात आली. तसेच पेन्शनर संघटना अधिक बळकट करण्याचे ठरविण्यात आले. या मेळाव्यात बी. जी. घाडी यांनी…

Read More

पाटकर हायस्कूलला सीसीटी कॅमेरा प्रदान…!

⚡वेंगुर्ला ता.०६-: येथील रा.कृ.पाटकर हायस्कूलचे १९६४च्या बॅचचे माजी विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते मनोहर साबाजी गिरप यांच्या देणगीतून सुरक्षिततेच्यादृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे देणगी दाखल दिले आहेत. याचे औपचारिक उद्घाटन माजी नगराध्यक्ष राजन गिरप यांच्या हस्ते झाले. यावेळी साईप्रसाद नाईक, प्रा. महेश बोवलेकर, प्रा.सुशांत धुरी, प्रा.सजय पोटफोडे, प्रा.विलास गोसावी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

Read More

टेम्पोची धडक बसल्यामुळे झरेबांबर येथे एका सात वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू …!

⚡दोडामार्ग ता.०६-: भाजी वाहतूक करणाऱ्या भरधाव टेम्पोची धडक बसल्यामुळे झरेबांबर येथे एका सात वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला.ती रस्ता ओलांडत असताना शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. श्रेया संदीप गवस (रा. मांगेली) असे तिचे नाव आहे. तिला अधिक उपचारासाठी तिथून रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तत्पुर्वीच तिचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान…

Read More

९ व १० डिसेंबर ला फोंडाघाट न्यू इंग्लिश स्कूल येथे विज्ञान प्रदर्शन…

आमदार नितेश राणे यांच्या हस्ते होणार उ‌द्घाटन.. कणकवली : जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग, कणकवली पंचायत समिती व फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने ५२ वे कणकवली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन दि. ९ ते १० डिसेंबर या कालावधीत न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज फोंडाघाट येथे आयोजित करण्यात आले आहे. या…

Read More

जिल्ह्यात उद्यापासून क्षयरोग शोध मोहिम…

१०० दिवस चालणार उपक्रम:डॉ पाटील यांची माहिती… ओरोस ता ६राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्हयात ७ डिसेंबरपासून १०० दिवसीय क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहिम २४ मार्च २०२५ “जागतिक क्षयरोग दिन” रोजी संपणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यांनी दिली.या मोहिमेचा उद्देश हा जास्तीत जास्त क्षयरुग्ण शोधून त्यांना उपचारावर आणणे….

Read More
You cannot copy content of this page