निगुडे सरपंचांच्या विरोधात गुरुदास गवंडे यांच उपोषण सुरू…

सावंतवाडी : सरपंच पदाचा गैरवापर करून शासकीय पैसे स्वतःच्या खात्यात वर्ग करणाऱ्या निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर यांच्यावर आर्थिक गैर व्यवहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी करत पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

सरपंच ग्रा.प. निगुडे यांनी डी.एस.सी. वापरुन PFMS रक्कम अन्य खात्यात जमा करुन आर्थिक गैरव्यवहार केलेबाबत. निगुडे सरपंच श्री. लक्ष्मण गंगाराम निगुडकर यांनी आपली डी.एस.सी. वापरुन अन्य खात्यात रक्कम जमा केलेली आहे, त्यामुळे सदर आर्थिक गैर व्यवहाराची खातेनिहाय चौकशी करुन सबंधीत सरपंच यांचावर आर्थिक गैरव्यवहार व अनियमितता यांच्या अंतर्गत ग्रा.प.अधिनियम १९५८ कलम ३९ प्रमाणे कारवाई व फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करत श्री गवंडे यांनी उपोषण छेडलं आहे.

You cannot copy content of this page