सावंतवाडीतील पाळणेकोंड धरणओव्हरफ्लो..
⚡सावंतवाडी ता.१२-: शहराला पाणी पुरवठा करणारे पाळणेकोंड धरण आज पहाटे ३.४५ वाजता पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहे. धरणाचे सर्व सहाच्या सहा हायड्रोलिक दरवाजे ओव्हरफ्लो झाले असून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. यंदा पावसाचे वेळापत्रक काहीसे कोलमडल्यामुळे धरणाची पाणीपातळी सुमारे एक मीटरने खाली होती. त्यामुळे शहरवासीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, गेल्या दोन…
