जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना नशामुक्तीची शपथ
सिंधुदुर्गनगरी, दि.18 : भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या निर्देशानुसार, ‘नशा मुक्त भारत अभियाना’च्या ६व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथील मायनाक भंडारी सभागृहात ‘National Pledge Against Drug Abuse’ (अंमली पदार्थ विरोधी राष्ट्रीय प्रतिज्ञा) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय आणि सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला…
