Headlines

नारळ उत्पादकांना पाच वर्षांसाठी मोफत खत

बांदा/प्रतिनिधीनारळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी नारळ विकास मंडळाकडून विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पाच वर्षांसाठी मोफत खत उपलब्ध करून देण्यात येणार असून, प्रति माड १२० रुपये किमतीचे खत मिळणार आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचे अर्ज भरण्याचे काम बांदा येथील सिंधुदुर्ग फळबागायतदार संस्थेच्या कार्यालयात सुरू आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दाखल करावा….

Read More

श्रावण सोमवारनिमित्त सोनगेवाडीतील महिलांना मोफत कुणकेश्वर दर्शनाचा योग

कणकवली : कणकवली नगरपंचायतीच्या सोनगेवाडी, प्रभाग क्रमांक ११ मधील महिलांसाठी श्रावण सोमवारनिमित्त मोफत कुणकेश्वर दर्शन चे आयोजन करण्यात आले होते. महिलांना धार्मिक दर्शनाचा आनंद मिळावा, तसेच महिलांमध्ये स्नेह, आपुलकी आणि सामाजिक एकोपा अधिक दृढ व्हावा, या उद्देशाने सुजित जाधव यांच्या संकल्पनेतून या सहलीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमासाठी नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले….

Read More

कणकवलीत फळांच्या वखारीची एफ.डी.ए कडून पाहणी

कणकवली : केमिकलमध्ये फळे पिकवून फळांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई चा इशारा अलीकडेच पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला होता. याअनुषंगाने एफडीएचे सहाय्यक आयुक्त ललित गायकवाड व सहकारी अधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी 7 वाजता कणकवली शहरातील एका घाऊक फळविक्रेत्याच्या वखारीची पाहणी केली. सहाय्यक आयुक्त गायकवाड यांच्यासोबत अन्न सुरक्षा अधिकारी तेजश्री ताजणे, किरण गावित उपस्थित होते. या वखारीतील केळी…

Read More

नरडवे प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मोठा दिलासा…

१५२ कुटुंबांना ६.८३ कोटींचे स्वेच्छा पुनर्वसन अनुदान मंजूर:पालकमंत्री नितेश राणेंच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीनंतर प्रश्नाला निर्णायक गती.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२४-:नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नाला अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रातील पाच गावांमधील १५२ प्रकल्पबाधित कुटुंबांना स्वेच्छा (ऐच्छिक) पुनर्वसन अनुदानापोटी तब्बल ६ कोटी ८३ लाख १ हजार ८८७ रुपयांची रक्कम अदा करण्यास…

Read More

नारळ उत्पादकांना पाच वर्षांसाठी मोफत खत

बांदा/प्रतिनिधीनारळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी नारळ विकास मंडळाकडून विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पाच वर्षांसाठी मोफत खत उपलब्ध करून देण्यात येणार असून, प्रति माड १२० रुपये किमतीचे खत मिळणार आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचे अर्ज भरण्याचे काम बांदा येथील सिंधुदुर्ग फळबागायतदार संस्थेच्या कार्यालयात सुरू आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दाखल करावा….

Read More

मुडेडोंगरी मैदानाच्या मोजणीला ग्रामस्थांचा विरोध…

संपूर्ण ११०० गुंठ्यांची मोजणी करण्याची मागणी :नगरपंचायत प्रशासनच्या आश्वासनानंतर २४८ गुंठ्यांच्या मोजणीला संमती:नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांची मध्यस्थी यशस्वी कणकवली : कणकवली शहराच्या १९९९ च्या विकास आराखड्यात मुडेडोंगरी परिसरातील सुमारे ११०० गुंठे क्षेत्र क्रीडांगणासाठी आरक्षित करण्यात आले आहे. गेल्या २६-२७ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रस्तावाच्या अंमलबजावणीला आता गती मिळाली असून, पहिल्या टप्प्यातील २४८ गुंठ्याची मोजणी करताना नागरिकांनी…

Read More

अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाला आली जाग…

आरोंदा ते न्हावेली रस्त्यावरील वाढलेली झाडे व गवत कापण्याचे काम सुरु ; पं.स सदस्य शरद धाऊसकर यांच्या मागणीला यश सावंतवाडीआरोंदा मुख्य रस्ता ते न्हावेली रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडे तोडण्यासोबत व गवत मारण्याबाबत पंचायत समिती सदस्य शरद धाऊसकर यांनी अलीकडेच झालेल्या पंचायत समितीच्या मासिक मीटिंगमध्ये आवाज उठवतात जागे झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने अखेर हे काम आजपासून…

Read More

वेंगुर्ला बसस्थानकातून उद्यापासून वेंगुर्ला – अक्कलकोट विशेष बसफेरी

वेंगुर्लामहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ वेंगुर्ला आगार मार्फत मंगळवारी25 ऑगस्ट रोजीसकाळी 7:45 वा.वेंगुर्ला बसस्थानकातूनवेंगुर्ला मठमार्गे – कुडाळ – कणकवली – गगनबावडा मार्गे – अक्कलकोट(श्री स्वामी समर्थ महाराज महाराज पीठ) पर्यंत विशेष बसफेरी सोडण्यात येणार आहे. यासाठी75 वर्षावरील प्रवाशांना मोफत प्रवास,ज्येष्ठ नागरिक (65 ते 75 वर्ष 50 टक्के सवलत),महिलांसाठी असणारी 50 टक्के तिकीट सवलतया फेरीमध्ये लागू…

Read More

सावंतवाडीत रंगणार ‘रानभाज्या व गावठी वस्तू महोत्सव’…

महिला व बालकल्याण समितीचा पुढाकार; २५ व २६ ऑगस्टला नगरपरिषद प्रांगणात आयोजन.. ⚡सावंतवाडी, ता. २४ -: पावसाळ्यात निसर्गात नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या विविध रानभाज्यांची नागरिकांना ओळख व्हावी, तसेच त्यांच्या औषधी गुणधर्म व पौष्टिकतेबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने सावंतवाडी नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने दोन दिवसीय ‘रानभाज्या व गावठी वस्तू महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव…

Read More

राष्ट्रीय बुद्धिबळपटू बाळकृष्ण पेडणेकर याचे विदयार्थ्यांसाठी बुद्धिबळचे विशेष मार्गदर्शन शिबीर…

⚡सावंतवाडी ता.२४-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अव्वल मानांकित आंतरराष्ट्रीय रेटेड बुद्धिबळ खेळाडू आणि राज्य पंच बाळकृष्ण पेडणेकर याचे विदयार्थ्यांसाठी बुद्धिबळ खेळाचे विशेष मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. रविवार दि.३० ऑगस्ट रोजी सकाळी ०९:३० वाजता सावंतवाडी येथील पाटणकर वाड्यातील मुक्ताई ॲकेडमीच्या प्रशिक्षण केंद्रात शिबीर घेण्यात येईल. पुढील कालावधीत होणा-या विदयार्थ्यांच्या तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरीय शालेय बुद्धिबळ…

Read More
You cannot copy content of this page