Headlines

वैभववाडीतील युवा वकील ॲड. विवेक गोखले यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन…

वैभववाडी प्रतिनिधीमहाराष्ट्र ब्राह्मण मंडळ सिंधुदुर्गचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य तथा वैभववाडीतील वकील ॲड. विवेक गोखले (३४) यांचे सोमवारी मध्यरात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.​ॲड. विवेक गोखले हे गेली काही वर्षे वकिली क्षेत्रात काम करीत आहेत. त्याचसोबत सामाजिक कार्यात सक्रिय होते. महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ सिंधुदुर्गच्या जिल्हा…

Read More

हनुमंत प्रभू यांच्या स्वखर्चातून ज्ञानदीप हायस्कुलचा परिसर स्वच्छ

मालवण दि प्रतिनिधीवायंगणी येथील ज्ञानदीप संस्थेच्या ज्ञानदीप हायस्कुलच्या आवारातील जुनाट झाडाच्या मरगळलेल्या फांद्या व बांडगुळे काढून तसेच नारळाची झाडे व आंबा कलमांच्या सभोवतालची झाडी हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला. हा संपूर्ण उपक्रम संस्थेचे अध्यक्ष श्री. हनुमंत प्रभू यांनी आपल्या स्वखर्चाने राबविला. शाळेच्या इमारतीवर वानर उड्या मारत असल्याने कौले फुटण्याचे प्रकार घडत होते. यावर उपाय म्हणून…

Read More

वीजेचा धक्का लागून पडलेल्या माकडाच्या पिल्लाला जीवदान

मालवण : (प्रतिनिधी) मालवण शहरातील भरड नाका येथील दत्त मंदिराजवळ सोमवारी सकाळी वीजेचा धक्का लागून माकडाचे एक पिल्लू खाली पडल्याची घटना घडली. जखमी अवस्थेत पडलेल्या या पिल्लाला स्थानिकांच्या तत्परतेमुळे वेळीच उपचार मिळाल्याने त्याचे प्राण वाचवण्यात यश आले. ही घटना भरड येथील स्थानिक व्यावसायिक राजन बादेकर यांच्या दुकानासमोर घडली. माकडाचे पिल्लू वीजेच्या धक्क्याने खाली पडल्याचे लक्षात…

Read More

शैक्षणिक उपक्रमातून सामाजिक संस्थांनी केलेली गुंतवणूक आदर्शवत …

हर्षदा वाळके:नांदगाव पंचक्रोशीतील प्राथमिक शाळांमध्ये वह्या वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ; प्राण जीवन संयोग संस्था व जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून उपक्रम.. ⚡कणकवली ता.२४-:प्राण जीवन संयोग संस्था व जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून वह्या वाटपाच्या उपक्रमात मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे, तो आम्हाला दिसत आहे. मुलांची प्रगती होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा विकास होण्यासाठी हा उपक्रम आहे. विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी हा…

Read More

सावंतवाडी शहर चौकी पुन्हा सुरू करा…

संजू शिरोडकर यांची मागणी:उभा बाजार-चितार आळी येथे पोलीस चौकी कार्यान्वित करण्याची मागणी.. सावंतवाडी : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी काझी शहाबुद्दीन हॉल येथे सेवा अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानादरम्यान सावंतवाडी शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी शहर पोलीस चौकी पुन्हा सुरू करण्यात यावी अशी मागणी भाजपचे माजी शहराध्यक्ष…

Read More

शिक्षक कार्यकर्त्यांना संघटनात्मक बळ…

कोकण विभागीय प्रशिक्षण शिबिर २६ ऑगस्टला ओरोस येथे; पाच जिल्ह्यांतील पदाधिकारी होणार सहभागी.. ⚡ओरोस, ता. २४-: प्राथमिक शिक्षकांच्या संघटनात्मक चळवळीला अधिक बळ देतानाच शाळा, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे कोकण विभागीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर बुधवारी (ता. २६) सिंधुदुर्गनगरी-ओरोस येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात सिंधुदुर्ग,…

Read More

जिल्ह्यात उद्यापासून ऑनलाईन खत विक्रीस प्रारंभ…

‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणालीमुळे खत खरेदी अधिक सुलभ व पारदर्शक होणार.. ⚡सिंधुदुर्ग,ता.२४-: जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळेवर, वाजवी दरात आणि सहजतेने अनुदानित रासायनिक खते उपलब्ध व्हावीत, यासाठी केंद्र शासनाच्या ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (FFS) या डिजिटल प्रणालीची अंमलबजावणी जिल्ह्यात २५ ऑगस्ट २०२६ पासून करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यासह ९ जिल्ह्यांचा समावेश करण्यात…

Read More

*सेवा अभियानला सावंतवाडीत उत्स्फूर्त प्रतिसाद…

३७० निवेदने सादर प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून सर्व प्रश्न सोडवू;आमदार प्रमोदजी जठार.. ⚡सावंतवाडी ता.२४-: भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्र चव्हाण साहेब यांच्या संकल्पनेतून सर्वसामान्य नागरिक, भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या शासकीय कार्यालयांमध्ये प्रलंबित असलेल्या कामांना गती देण्यासाठी तसेच त्यांच्या अडचणी व समस्या सोडवण्यासाठी ‘सेवा अभियान’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे.मा….

Read More

‘इको सेन्सिटिव्ह झोन’विरोधात सावंतवाडीकरांनी एकजूट व्हावे…

२ ते ३ हजार हरकती नोंदविण्याचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकरांचे आवाहन; नगरपरिषदेचा सर्वपक्षीय विरोधाचा ठराव.. सावंतवाडी : केंद्र शासनाकडून २७ जुलै रोजी सावंतवाडी नगरपरिषद हद्दीसाठी प्राप्त झालेल्या ‘इको सेन्सिटिव्ह झोन’च्या अधिसूचनेला विरोध दर्शवण्यासाठी शहरातील नागरिकांनी जास्तीत जास्त हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी केले आहे. नगरपरिषद हद्दीत हा झोन लागू…

Read More

नारळ उत्पादकांना पाच वर्षांसाठी मोफत खत

बांदा/प्रतिनिधीनारळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी नारळ विकास मंडळाकडून विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पाच वर्षांसाठी मोफत खत उपलब्ध करून देण्यात येणार असून, प्रति माड १२० रुपये किमतीचे खत मिळणार आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचे अर्ज भरण्याचे काम बांदा येथील सिंधुदुर्ग फळबागायतदार संस्थेच्या कार्यालयात सुरू आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दाखल करावा….

Read More
You cannot copy content of this page