Headlines

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत सेलिब्रेटी भेट गावे निश्चित…

वेत्ये, अनाव, कलमठ, लोरे नंबर १ गावांना सेलिब्रिटी देणार भेट:११ जानेवारी रोजी कार्यक्रम.. ओरोस ता ९मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये अंतर्गत सेलिब्रिटी भेटीसाठी सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये, कुडाळ तालुक्यातील अणाव आणि कणकवली तालुक्यातील कलमठ आणि लोरे नंबर १ या चार गावांची निवड करण्यात आली आहे. या चारही गावांत नियोजित कार्यक्रमानुसार ११ रोजी सेलिब्रिटी भेट देणार आहेत. दरम्यान,…

Read Full News

मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे १० जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर…

⚡कणकवली ता.०९-: महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवार, दिनांक २१० जानेवारी २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्या दरम्यान विविध धार्मिक, विकासात्मक तसेच प्रशासकीय कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत. त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे – सकाळी ७ वा. सुवर्णगड, मुंबईहून सांताक्रूझ विमानतळावरून जेट एअरक्राफ्टने गोव्याकडे रवाना…

Read Full News

सिंधुदुर्गातील शाळा वाचविण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे शिक्षण मंत्र्यांना पत्र…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०९-:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थां, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्चात दिलेला शब्द सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नितेश राणे यांनी कृतीत उतरवला आहे. राज्य सरकारचा 15 मार्च 2024 चा शासन निर्णय सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तेला बाधक ठरत असल्याने तो रद्द अथवा सुधारित करावा, अशी मागणी त्यांनी शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे….

Read Full News

कणकवलीत २४ जानेवारी रोजी ‘लहान मुलांसाठी खाऊ गल्ली’ चे आयोजन…

१ हजार मुलांना ५० रुपयांचे मोफत कुपन ; ऑर्केस्ट्रा, फनी गेम्स व मनोरंजनाची रेलचेल.. ⚡कणकवली ता.०९-: दरवर्षीप्रमाणे यंदाही समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने लहान मुलांसाठी ‘खाऊ गल्ली’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, दि. २४ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता जानवली नदीवरील गणपती साना येथे होणार आहे. या कार्यक्रमात एक हजार लहान…

Read Full News

सोनुर्ली निगुडे मार्गावरील पुलाबाबत उपसरपंच गावकर यांचा उपोषणाचा इशारा…

बांधकाम उपअभियत्यांना निवेदन ; आठ दिवसात कार्यवाहीची मागणी.. ⚡सावंतवाडी ता.०९-: सोनुर्ली-निगुडे मार्गावरील रेल्वे पुलाजवळ असलेला ओहळावरील पूल पूर्णतः कमकुवत झाले असून, येत्या आठ दिवसात यासंदर्भात कार्यवाही न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर 26 जानेवारी रोजी उपोषण छेडण्याचा इशारा सोनुर्ली उपसरपंच भरत गावकर यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता अजित पाटील…

Read Full News

रोणापाल येथे काजू बागेला भीषण आग…

आगीमध्ये दोन ते तीन लाखांचे नुकसान.. ⚡बांदा ता.०९-: रोणापाल पुरण येथील मोहर आलेल्या काजू बागायतीला सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली.सदर काजू बागायती सात वर्षं झाली होती व आताच ती उपन्न देणारी होती. एकूण शेतकऱ्यांचे दोन ते तीन लाखांचे नुकसान झाले आहे. नुकसानीमध्ये अमित नकुळ गावडे, सहदेव जयराम गावडे, तानाजी महादेव गावडे, यांच्या काजू…

Read Full News

स्वच्छता मोहिमेत डावलल्यानेशिंदे शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक…

प्रभारी मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालत विचारला जाब: तर मलाच या अभियानाची कल्पना नाही, मुख्याधिकाऱ्यांचा स्पष्टीकरण.. ⚡सावंतवाडी ता.०९-: येथील नगरपरिषद प्रशासनाकडून सावंतवाडी बस स्थानक परिसरात राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकांना डावलल्याने आक्रमक झालेल्या शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकानी गटनेते बाबू कडतरकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रभारी मुख्याधिकारी विनायक औंधकर यांना घेराव घालत जाब विचारला सत्ताधाऱ्यांकडून जाणून-बोलून आम्हाला बाजूला ठेवण्याचा…

Read Full News

जानवली येथे कार–दुचाकी अपघातदुचाकीस्वार जखमी…

जानवली येथे कार–दुचाकी अपघातदुचाकीस्वार जखमी.. ⚡कणकवली ता.०९-: मुंबई–गोवा महामार्गावर कणकवली नजीकच्या जानवली येथे कार व दुचाकी यांच्यात आज दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातात कार व दुचाकी या दोन्ही वाहनांचे नुकसान झाले…

Read Full News

हत्ती पकड मोहिमेच्या खर्चाची माहिती द्या…

अन्यथा आंदोलनाचा इशारा:वृक्षवल्ली संघटनेची वनविभागाला निवेदन.. ⚡ सावंतवाडी ता.०९-:सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील २० वर्षांपासून राबविण्यात येत असलेल्या हत्ती पकड मोहिमेअंतर्गत सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यांमध्ये करण्यात आलेल्या कामांच्या खर्चाबाबत सविस्तर माहिती द्यावी, अशी मागणी वृक्षवल्ली संघटना, सावंतवाडीच्या वतीने वनविभाग अधिकाऱ्यांकडे निवेदनद्वारे करण्यात आली आहे.वृक्षवल्ली संघटनेचे अध्यक्ष श्री. अजित सांगलेकर यांनी सावंतवाडी वनविभागाच्या उपवनसंरक्षकांना निवेदन सादर केले आहे….

Read Full News

शिक्षक सर्वांगीण ज्ञान देणारा असावा…

डॉ. संजीव आकेरकर:बॅ शिक्षण संस्थेच्या विविध अभ्यासक्रमांचे स्नेहसंमेलन… ⚡कुडाळ ता.०९-: शिक्षक नुसता पुस्तकी ज्ञान देणारा नसावा, तर त्याबरोबर सर्वांगीण ज्ञान देणारा असावा. विद्यार्थ्यांमधील भीती दूर करून सुप्त गुणांना पुढे आणणारा असावा. असे प्रतिपादन डॉ. संजीव आकेरकर यांनी केले. बॅ.नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग संचलित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बीएड कॉलेज व बॅरिस्टर नाथ पै…

Read Full News

You cannot copy content of this page