“न्याय न मिळाल्यास महिला दिनी उपोषण…

वैभवी साटेलकर यांचा प्रशासनाला इशारा..

⚡सावंतवाडी ता.०५-: वरिष्ठांच्या आदेशानंतरही ग्रामपंचायत डाटा इंट्री ऑपरेटर म्हणून हजर करुन घेत नसल्याबद्दल वैभवी प्रशांत साटेलकर यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. जागतिक महिला दिनापासून त्या पंचायत समिती सावंतवाडी समोर उपोषणाला बसणार आहे.

त्या म्हणाल्या, मी गर्भवती असून उपोषणामुळे मला व माझ्या बाळाला कोणत्याही प्रकारे त्रास झाल्यास, जीवीतास धोका निर्माण झाल्यास त्यास सरपंच, उपसरपंच व तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी कुबल व विद्यमान ग्रामपंचायत अधिकारी सावंत हेच जबाबदार राहतील असं मत त्यांनी व्यक्त केल आहे. त्यामुळे एकिकडे जिल्ह्यात महिला दिनाचा सोहळा करणार प्रशासन गर्भवती महिलेला उपोषणापूर्वी न्याय देणार का ? याकडे लक्ष लागून राहिले आहे.

You cannot copy content of this page