शहिदी समागमानिमित्त ओझर विद्यामंदिरात विविध उपक्रम संपन्न…

⚡मालवण ता.०५-:
शिखांचे नववे गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त कांदळगाव येथील मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समिती संचलित, ओझर विद्यामंदिर या माध्यमिक शाळेत गेल्या पंधरा दिवसांत विविध शैक्षणिक व प्रबोधनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

शाळेत त्यांच्या जीवनावर आधारित बहुपर्यायी प्रश्न परीक्षा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा तसेच घोषवाक्य फेरी अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या सर्व उपक्रमांचा समारोप राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून करण्यात आला. यावेळी भंडारी ज्युनियर कॉलेज, मालवण येथील प्रा. पवन बांदेकर यांनी गुरु तेग बहादूर साहिब यांच्या कार्यावर आधारित व्याख्यान देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्यकारी मंडळ सदस्य नंदकुमार राणे होते. व्यासपीठावर मुख्याध्यापक डी. डी. जाधव, अ. अ. शेर्लेकर, एस. जे. सावंत, सुनयना पवार, सर्व शिक्षकेतर कर्मचारी होते.

You cannot copy content of this page