Headlines

आचरा पिरावाडी येथे शिमगोत्सवाचे आयोजन…

⚡मालवण ता.०५-:
ग्रामोन्नती मंडळ आचरा पिरावाडी यांच्यावतीने गुरुवार दि. ५ ते ९ मार्च या कालावधीत शिमगोत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त श्री देव चव्हाटा रंगमंच, आचरा पिरावाडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये दि.५ मार्च रोजी रात्री १०. ३० वा. श्री तरुण संघ दक्षिणवाडा आणि श्री हनुमान मंदिर न्यास दक्षिणवाडा यांच्या वतीने कलाविष्कार डान्स अकॅडमी मालवण निर्मित व्हरायटी शो सादर होणार आहे. दि. ६ मार्च रोजी रात्री १० वाजता मधलावाडा ग्रामस्थ सभा आचरे पिरावाडी निर्मित यशवंत बालनाट्य मंडळ प्रस्तुत ‘भावकी’ हे दोन अंकी मालवणी विनोदी नाटक सादर होणार आहे. दि. ७ मार्च रोजी रात्री १० वा. श्री राधाकृष्ण मंदिर देवस्थान पिरावाडी यांच्यातर्फे श्री बाळगोपाळ दिंडी भजन आचरा वरचीवाडी यांचे दिंडी नृत्य होणार आहे. दि. ८ मार्च रोजी श्री विठ्ठल समाज विकास मंडळ उत्तरवाडा आचरा पिरावाडी प्रस्तुत डी ब्रदर्स आणि गंधर्व ग्रुप देवली निर्मित ‘सध्या या शिक्षणाची गरज हा’ हे दोन अंकी मालवणी विनोदी नाटक सादर होणार आहे. तर दि. ९ रोजी रात्री १०. ३० वा. ग्रामोन्नती मंडळ आचरा पिरावाडी प्रस्तुत कला रंगभूमी निर्मित ‘घराबाहेर- एक अधुर स्वप्न’ हे नाटक सादर होणार आहे. तर दि. ११ मार्च रोजी दुपारी १२. ३० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page