आडेली गावात उद्या प्रसिद्ध ” घोडेमोडणी ” उत्सव..
⚡वेंगुर्ला ता.०५-: वेंगुर्ला शहरासह तालुक्यात होळी पौर्णिमा साजरी झाल्यानंतर शिमगोत्सवाने रंगत आणली आहे. तालुक्यातील गावागावात शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे .गुरुवारी चौथ्या दिवशी ग्राम देवदैवतांचे निशाणासाह घरोघरी वाजतगाजत आगमन झाले होते व आज रात्री, उद्यापर्यंत घरोघरी आगमन होणार आहे. यात रंगपंचमीत तरुणाईसह मुंबईकर दाखल झाले आहेत. गावाच्या परंपरेनुसार आज “रोम्बाट” या परंपरेत घरोघरी उत्साह निर्माण झाला होता. उद्या आडेली गावात “घोडेमोडणी” हा प्रसिद्ध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार असून श्री देव चव्हाटा मंदिर येथे मांडावर देवतेस नारळ ठेऊन विशेष ‘खेळे’ हा परंपरेचा कार्यक्रम होणार आहे.तालुक्यात ग्रामीण भागात पाचव्या दिवशी मोठया उत्साहात धार्मिक कार्यकम संपन्न होणार आहेत.
