Headlines

कणकवली नगरपंचायत उपनगराध्यक्ष पदी सुशांत नाईक यांची निवड…

⚡कणकवली ता.१३-: कणकवली नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदासाठीची निवड प्रक्रिया मंगळवारी नगरपंचायतीच्या सभागृहात पार पडली. हात उंचावून झालेल्या या मतदान प्रक्रियेत कणकवली शहर विकास आघाडीचे सुशांत नाईक यांनी भाजपच्या राकेश राणे यांच्यावर मात करत उपनगराध्यक्षपद पटकावले. मतदान प्रक्रियेत राकेश राणे यांना ९ मते मिळाली. तर नगराध्यक्षांना मताचा अधिकार असल्याने व कणकवली शहर विकास आघाडीचे आठ नगरसेवक असल्याने…

Read Full News

वेंगुर्ला नगरपरिषद उपनगराध्यक्षपदी सुहास गवंडळकर यांची बिनविरोध निवड…

⚡वेंगुर्ला ता.१३-: वेंगुर्ला नगरपरिषद उपनगराध्यक्षपदी विनायक ( सुहास ) सदानंद गवंडळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.हीनिवड आज मंगळवारी 13 जानेवारी रोजी दुपारी वेंगुर्ला नगरपरिषद छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे पिठासन अधिकारी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली. यावेळी स्वीकृत नगरसेवक म्हणून प्रशांत वसंत आपटे व यशवंत (…

Read Full News

साटेली येथील विनापरवाना मायनिंग उत्खनन थांबवा…

ॲड. आल्हाद नाईक:दरड कोसळून मोठी दुर्घटना झाल्यास त्याला जबाबदार कोण..? ⚡सावंतवाडी ता.१३-: सावंतवाडी तालुक्यातील साटेली गावात बेकायदेशीर मायनिंग उत्खनन केले जात असून हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. तरी सदरचे उत्खनन थांबवावे अशी मागणी ॲड. आल्हाद नाईक यांनी जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देऊन केली आहे. साटेली येथे उत्खनन करून ठेवलेल्या मालाची वाहतूक करण्यासाठीच परवानगी दिलेली असताना बेकादेशीरपणे…

Read Full News

शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्यांबाबत ऑटो रिक्षा सेना चालक-मालक संघटनेचे नगराध्यक्षांना निवेदन…

⚡सावंतवाडी ता.१३-: ऑटो रिक्षा सेना चालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काल सोमवारी सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोसले यांची भेट घेत शहरातील वाढत्या वाहतुक कोंडीच्या समस्यांबाबत सविस्तर निवेदन नगराध्यक्षांना सादर केले. या भेटीदरम्यान संघटनेच्यावतीने नगराध्यक्ष सौ. श्रद्धाराजे भोसले यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन संघटनेचे खजिनदार जयवंत टमसाळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नगराध्यक्ष यांनी शहरातील वाहतूक कोंडीच्या…

Read Full News

सावंतवाडीत उद्या स्वीकृत नगरसेवकांची निवड…

भाजपकडून अँड. सिद्धार्थ भांबुरे, शिंदे शिवसेनेकडून अँड. निता सावंत कविटकर यांची नावे निश्चित.. सावंतवाडी ता.१३-: सावंतवाडी नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांची निवड उद्या होत आहे. भाजपचे 11 आणि शिंदे शिवसेनेचे 7 नगरसेवक असल्यामुळे दोन्ही गटांचा प्रत्येकी एक स्वीकृत नगरसेवक निवडला जाणार आहे. भाजपकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी अँड. सिद्धार्थ भांबुरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती असून तर शिंदे…

Read Full News

कणकवली नगरपंचायत उपनगराध्यक्ष पदासाठी आज दोन जणांचे अर्ज…

शहर विकास आघाडीच्या माध्यमातून सुशांत नाईक तर भाजपकडून राकेश राणे.. ⚡कणकवली ता.१३-: कणकवली नगरपंचायत च्या उपनगराध्यक्ष पदाकरिता आज निवडणूक प्रक्रिया होणार असून या निवडणुकीत कणकवली शहर विकास आघाडीकडून सुशांत नाईक यांचे नाव निश्चित झाल्यास झाल्यानंतर या निवडणुकीकरिता सर्वप्रथम भाजपाने प्रभाग क्रमांक 1 मधील विजयी उमेदवार नगरसेवक राकेश बळीराम राणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे….

Read Full News

शिरोडा येथे धाडसी घरफोडी : सुमारे 2.5 लाखाचा मुद्देमाल चोरीस…

⚡वेंगुर्ला ता.१२-: वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा देऊळवाडी येथेअज्ञात चोरट्याने वीज मीटरच्या उघड्या बॉक्समध्ये ठेवलेल्या घराच्या चावीच्या सहाय्याने मुख्य दरवाजाचे कुलूप उघडून आत प्रवेश करूनएकूण 2 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याबाबतची फिर्याद आज 12 जानेवारी रोजी पल्लवी पांडुरंग परब (वय 49, रा. परबवाडा शिरोडा,ता. वेंगुर्ला) यांनी वेंगुर्ला पोलीस स्थानकात दिली आहे.ही चोरीची घटना…

Read Full News

जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुकीसाठी जोमाने काम करा…

बाबुराव धुरी: ठाकरे शिवसेनेची वेंगुर्ला तालुक्याची मासिक बैठक संपन्न.. ⚡वेंगुर्ला ता.१२-:वेंगुर्ला नगरपरिषद मध्ये निवडणुकीत अपयश आले असले तरी पुन्हा संघटना वाढीसाठी एकत्र येऊन जोमाने काम करूया. आगामी जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुकीत स्वबळावर लढण्यासाठी आतापासूनच कामाला लागा, असे प्रतिपादन जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी वेंगुर्ला येथे बोलताना केले. वेंगुर्ला तालुका ठाकरे शिवसेना पक्षाची मासिक सभा…

Read Full News

कुणकेश्वराचे देवस्थान हे सुद्धा 12 ज्योतिर्लिंग एवढेच मोठे आहे, अशी आमची धारणा…

विलास खानोलकर:श्री देव कुणकेश्वर चरणी शिवपिंडीवर अभिषेक करत अतिरुद्र स्वाहाकारचे निमंत्रण.. ⚡देवगड ता.१२-:कणकवली आशिये पुरातन दत्त मंदिरामध्ये मंदिराचा वर्धापन दिन 2 फेब्रुवारी रोजी आहे. त्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने 25 जानेवारीपासून 9 दिवसांचा अतिरुद्र स्वाहाकार विधी त्या ठिकाणी करतोय. त्या कार्यक्रमाची पत्रिका ठेवण्यासाठी आम्ही कुणकेश्वर या ठिकाणी आलेलो आहोत. ही अतिरुद्र स्वाहाकार ही शंकराची उपासना आहे,…

Read Full News

निराधार महिलेला ‘जीवन आनंद’ची मायेची सावली…

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व नगरसेवक देव्या सूर्याजी यांच्या पुढाकाराने मिळाला सुरक्षित निवारा.. ⚡सावंतवाडी ता.१२-:सावंतवाडी शहरात गेल्या ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या उडपी येथील एका दांपत्यावर नियतीने घाला घातला. मागील वर्षी श्रीमती परवीन अझरुद्दीन शेख (वय ५५) यांच्या पतीचे आजाराने निधन झाले. मूलबाळ नसल्याने त्या पूर्णतः निराधार झाल्या. उदरनिर्वाहासाठी मिळेल ते काम करून त्या जीवन जगत होत्या;…

Read Full News

You cannot copy content of this page