Headlines

निराधार महिलेला ‘जीवन आनंद’ची मायेची सावली…

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व नगरसेवक देव्या सूर्याजी यांच्या पुढाकाराने मिळाला सुरक्षित निवारा.. ⚡सावंतवाडी ता.१२-:सावंतवाडी शहरात गेल्या ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या उडपी येथील एका दांपत्यावर नियतीने घाला घातला. मागील वर्षी श्रीमती परवीन अझरुद्दीन शेख (वय ५५) यांच्या पतीचे आजाराने निधन झाले. मूलबाळ नसल्याने त्या पूर्णतः निराधार झाल्या. उदरनिर्वाहासाठी मिळेल ते काम करून त्या जीवन जगत होत्या;…

Read Full News

आचरा पारवाडी दिंडीच्या कलाविष्काराने पंढरपूर नगरी दुमदुमली…

⚡मालवण ता.१२-:सिंधुदुर्ग जिल्ह्यात नावाजलेल्या श्री ब्राह्मणदेव सांस्कृतिक दिंडी भजन मंडळ आचरा पारवाडी या दिंडी भजन मंडळाने पंढरपुर येथे विठ्ठल मंदिर नामदेव पायरी समोर सादर केलेल्या दिंडी भजनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.दर्शनासाठी आलेल्या भाविकांना विठ्ठल दर्शनासोबत तुकोबा महाराजांचेही दर्शन आगळी अनुभूती देऊन गेले. आचरा पारवाडी येथील दिडी भजन मंडळाने पंढरपुर वारीचे नियोजन करत अक्कलकोट स्वामी समर्थ, तुळजाभवानी…

Read Full News

कुडाळ मध्ये २५ जानेवारीला इन्स्पायर सिंधुदुर्ग सायकल स्पर्धा…

२५ किमीची फनरेड तर ६०किमीची एलिट रेसचा समावेश.. कुडाळ : सायकलिस्ट्स असोसिएशन सिंधुदुर्ग आणि रेनबो रायडर्स ओरोसतर्फे आठव्या इन्स्पायर सिंधुदुर्ग या सायकल स्पर्धेचे कुडाळ येथे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी बॅ. नाथ पै मैदान, एमआयडीसी, कुडाळ येथुन ही स्पर्धा सुरू होणार आहे. स्पर्धा २५ किमी फन राईड व ६० किमी…

Read Full News

गोवा सीमेपासून बांदा तपासणी नाकापर्यंत पथदिवे बंद…

तात्काळ दिवे सुरू न केल्यास आंदोलन करणार:मिलिंद सावंत यांचा इशारा.. ⚡बांदा ता.१२-: मुंबई-गोवा महामार्गावरील बांदा येथे गंभीर स्वरूपाची समस्या निर्माण झाली असून, गोवा राज्याच्या सीमेपासून थेट बांदा पोलीस तपासणी नाकापर्यंत रस्त्याच्या दुभाजकातील पथदिवे पूर्णतः बंद अवस्थेत आहेत. परिणामी संपूर्ण मार्गावर रात्रीच्या वेळी काळोखाचे साम्राज्य पसरले असून वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या केवळ…

Read Full News

नट वाचनालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती साजरी…

⚡बांदा ता.१२-: येथील नट वाचनालयात स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास वाचनालयाचे सदस्य, मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी वाचनालयाचे संचालक जगन्नाथ सातोसकर, अनंत भाटे, अशोक आईर, विजेंद्र देसाई, संजय गवस, यशवंत गवस, गोविंद बांदेकर आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ…

Read Full News

पडवे धनगरवाडीतील वीजप्रश्नी ग्रामस्थ आक्रमक; प्रजासत्ताक दिनी उपोषणाचा इशारा…

⚡बांदा ता.१२-: सावंतवाडी तालुक्यातील पडवे धनगरवाडी येथील ग्रामस्थ महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे तीव्र नाराजी व्यक्त करत आक्रमक झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वीज समस्येबाबत वारंवार पाठपुरावा करूनही तोडगा न निघाल्याने, ग्रामस्थांनी थेट प्रजासत्ताक दिनी म्हणजेच २६ जानेवारी रोजी उपोषणास बसण्याचा इशारा महावितरणला दिला आहे.सन २०१८ मध्ये झालेल्या वादळात धनगरवाडीतील संपूर्ण वीज पोल व वाहिन्या…

Read Full News

जीवन गौरव पुरस्कारानिमित्त जेष्ठ पत्रकार सीताराम गावडे यांचा जन्मगावी निगुडे येथे भव्य सत्कार…

⚡सावंतवाडी ता.१२-:सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लबचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाल्यानंतर जेष्ठ पत्रकार तथा कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलचे संपादक सीताराम गावडे यांचा त्यांच्या जन्मगावी निगुडे येथे भव्य व आत्मीय सत्कार करण्यात आला.गावच्या ग्रामदैवत श्री माऊली देवीच्या मंदिरात देवस्थान कमिटी व मानकऱ्यांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व मानाची टोपी घालून हा सन्मान करण्यात आला.या प्रसंगी देवस्थानचे मुख्य…

Read Full News

माडखोल येथे भाजप युवा नेते विशालजी परब यांच्या हस्ते सैनिकांच्या सन्मानार्थ भव्य वास्तूचे उद्घाटन…

⚡सावंतवाडी ता.१२-: अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जाज्वल्य इतिहासाची प्रेरणा आणि सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माडखोल येथे नूतन बांधण्यात आलेल्या शिव छत्रपती सैनिक भवनचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला. भाजपचे धडधडीच युवा नेते विशालजी परब यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला. सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या माजी सैनिकांसाठी हक्काचे व्यासपीठ…

Read Full News

कुडाळ न्यायालय आणि विधी समितीच्या वतीने राष्ट्रीय युवादिन साजरा…

व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेजमध्ये आयोजन.. कुडाळ : येथील दिवाणी न्यायालय तथा तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघटना कुडाळ यांचे संयुक्त विद्यमाने व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेज कुडाळ येथे आज राष्ट्रीय युवादिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. कुडाळ दिवाणी न्यायालयचे दिवाणी न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समिती कुडाळचे अध्यक्ष जी ए कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम…

Read Full News

सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचा १६ ला स्नेहमेळावा…

सेवानिवृत्त केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी देखील उपस्थित राहणार.. ⚡कुडाळ ता.१२-: सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक असोसिएशन कुडाळ तालुकांतर्गत सेवानिवृत्त प्राथ. शिक्षक, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी यांचा स्नेहमेळावा शुक्रवार  १६ जानेवारी रोजी सकाळी ठिक १० ते २ या वेळेत मराठा समाज सभागृह कुडाळ, कुडाळ हायस्कुल नजीक येथे तालुकाध्यक्ष  श्री. घनःश्याम के. वालावलकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला आहे.या…

Read Full News

You cannot copy content of this page