सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद महिला व बालकल्याण समितीकडून जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पाककला स्पर्धा, स्वसंरक्षण मार्गदर्शन, फनी गेम्स आदींसह विविध उपक्रम राबविण्यात आले. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. येथील बॅ. नाथ पै सभागृहात नारीशक्तीचा जाग करण्यात आला.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून खास महिलांसाठी व नगरपरिषद मधील महिला कर्मचाऱ्यांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस उप निरीक्षक माधुरी मुळीक, महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, उपसभापती सुनिता पेडणेकर, सभापती आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर, मोहिनी मडगावकर, नगरसेवक अजय गोंदावळे, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, दुलारी रांगणेकर, सुकन्या टोपले, निलम नाईक, ॲड. सायली दुभाषी, पोलीस कॉन्स्टेबल सावी पाटील आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
महिला दिनाचे औचित्य साधून पाककला स्पर्धा, स्वसंरक्षण मार्गदर्शन, फनी गेम्स आदींसह विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी अनंत चिंचकर, कबीर हेरेकर, समृद्धी गावडे, जीया शेख, जीयाद शेख, प्रज्ञा मोंडकर, तृप्ती राऊळ, नेहा बांदेकर, स्तुती गुरव, अनुराधा महाजन, हर्षा देऊलकर, गोकुळी बुवा, सुप्रिया गावडे, अनिशा राणे, सुमीधा नाईक, प्रतिभा चितारी, विजय सुकी, अकीलाबाणु पटेल, नुपूर मठकर, महिला पत्रकार जुईली पांगम व अनुजा कुडतरकर, प्रज्ञा पांचाळ, निधी खडपकर, साक्षी रामदूरकर, सपना म्हापसेकर, वेणू सावंत आदींचा विशेष सन्मान करण्यात आला.
तसेच सावंतवाडी नगरपरिषदेच्या महिला कर्मचारी प्राची पाटील, प्राजक्ता कांबळे, आसावरी केळबाईकर, माधवी म्हापसेकर, परवीन शेख, नेहा आडेलकर, सोमिया चव्हाण, रेश्मा मेहतर, अनिता होडावडेकर, सपना जाधव, सुकन्या कुलकर्णी, शितल वाळके, लीना राणे, शमिका नेमळेकर, संजीवनी शिरसाट, गौरवी कुडाळकर, गौरी नाईक, रजनी शिंदे, प्रज्ञा काणेकर, भारती लाखे, गीता बरागडे, संगीता कदम, जया कदम, दशमी लाड, जया कदम, आशा बरागडे, संगीता कदम, अनुष्का सनम, गौतमी तेंडोलकर, रिया झोरे, अंजली वेंगुर्लेकर, गीता जाधव, निता कुडतरकर, सुगंधा चोडणकर, मिनाक्षी पवार, लक्ष्मी कांबळे आदींसह नगरपरिषदेच्या महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यानिमित्ताने महिलांसाठी फनी गेम्सच देखील आयोजन करण्यात आले होते. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रूपेश पाटील यांनी केलं. प्रास्ताविक महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर तर आभार उपसभापती सुनिता पेडणेकर यांनी मानले.
