ग्लोबल रक्तविरांगना मिनी मॅरेथॉन स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद….

हर्षाली वेंगुर्लेकर, ईशा शिरोडकर, श्रेया मांजरेकर, सिद्धी फोपळे, अनुष्का कदम, भारती आचरेकर यांची बाजी..

⚡मालवण ता.०८-: ग्लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग आणि ग्लोबल रक्तविरांगना मालवण यांच्या वतीने महिला दिनानिमित्त आणि स्व. नेहा कोळंबकर – शंकरदास यांच्या स्मरणार्थ मालवण येथे आयोजित केलेल्या महिलांसाठी ग्लोबल रक्तविरांगना मिनी मॅरेथॉन स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत विविध गटातून हर्षाली वेंगुर्लेकर, ईशा शिरोडकर, श्रेया मांजरेकर, सिद्धी फोपळे, अनुष्का कदम, भारती आचरेकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.

यावर्षी या स्पर्धेचे चौथे वर्ष होते. मालवण शहरातील सागरी महामार्गावर मालवण देऊळवाडा ते कोळंब पूल या दोन किलोमीटर अंतरासाठी सहा गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये पहिल्या ४ गटासाठी धावणे व पाचवा आणि सहावा गट (४६ ते ५६ वर्षापुढील ज्येष्ठ महिला) या वयोगटातील महिलांसाठी चालणे व धावण्याची स्पर्धा घेण्यात आली. गतविजेत्या अनिता आळवे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. या स्पर्धेत लहान मुली, युवती, तरुणी तसेच ज्येष्ठ महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत दोन किलोमीटरचे अंतर पार केले.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :- वयोगट १० ते १५ :- १.हर्षाली सत्यवान वेंगुर्लेकर, २.महिमा विशाल मोहिते, ३.इविना सालू वाडकर, ४.लिशा मनोज चव्हाण, ५.गार्गी संदेश पाडगावकर. वयोगट १६ ते २५:- १.ईशा विनायक शिरोडकर, २.श्रेया रमाकांत अटक, ३.ममता आनंद थवी, ४.भाग्यश्री जनार्दन मांजरेकर, ५.नजमुनिसा शेख. वयोगट २६ ते ३५ :- १.श्रेया सागर मांजरेकर, २.आराध्या प्रसाद गवंडी, ३.ऐश्वर्या गणेश प्रभुलकर, ४.वेदिता विशाल आचरेकर, ५.ऋग्वेदा धामापूरकर.

वयोगट ३६ ते ४५ :- १.सिद्धि विनायक फोपळे, २.शर्वरी पाटील, ३.नीलम मयेकर, ४.वैशाली माने, ५. प्रीती चव्हाण. वयोगट ४६ ते ५५ :- १.अनुष्का नागेश कदम, २.साक्षी पार्टे, ३.डॉ. शिल्पा झाट्ये, ४. वैदेही कोळमकर, ५.डॉ. पुष्पा माळी, वयोगट ५६ वर्षावरील:- १. भारती आचरेकर, २.अमृता वेझरे, ३.फॅनी फर्नांडिस, ४.अनिता आळवे, ५.शुभांगी सुकी यांनी यश मिळविले.

बक्षीस वितरण समारंभ नगराध्यक्ष ममता वराडकर, शिक्षिका डॉ. ज्योती तोरसकर, प्रा. सुमेधा नाईक, शिक्षिका सारिका शिंदे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. प्रत्येक गटातील प्रथम तीन तसेच इतर दोन उत्तेजनार्थ विजेत्या महिलांना आकर्षक चषक, मेडल व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन अजय शिंदे यांनी केले. यावेळी विजय पांचाळ, राजा शंकरदास, बंटी केरकर, राधा केरकर, वृषाली धुरी, पल्लवी खानोलकर, कविता वेंगुर्लेकर, सुविधा तिनईकर, नगरसेवक ललित चव्हाण, अमेय देसाई, कोमल चव्हाण, पूजा तळाशीलकर, वैशाली शंकरदास, रूपा बिडये, गौरवी पराडकर, अंकुश कातवणकर, राजू बिडये, दीपक ढोलम, अंकित शंकरदास, संदीप पेडणेकर, रेनोल्ड बुतेलो, सहदेव साळगावकर, रुपेश खोबरेकर, साई पारकर, हेमंत रामाडे, अभय कदम, अण्णा माणगावकर, रोहित गरगटे, महेंद्र पारकर, हनु हडकर आदी व इतर उपस्थित होते.

You cannot copy content of this page