Headlines

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक राणेंच्या नेतृत्वाखाली लढवणार..

मंत्री उदय सामंत यांची ठाम भूमिका: ओम गणेश निवासस्थानी घेतली खासदार नारायण राणे यांची उदय सामंत यांनी सदिच्छा भेट.. ⚡कणकवली ता.१६-:शिंदे शिवसेनेचे नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज कणकवलीतील ओम गणेश निवासस्थानी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे यांची सदिच्छा भेट घेतली. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण…

Read Full News

मुख्य बाजारपेठेतील रस्ता रखडला; नगरसेवक देव्या सूर्याजी आक्रमक…

पाईपलाईन कामानंतर १० दिवस उलटूनही डांबरीकरण नाही; आजच काम न झाल्यास नगरपरिषदेच्या दारात माती-खडी टाकून आंदोलनाचा इशारा.. ⚡सावंतवाडी ता.१६-: मुख्य बाजारपेठेत पाईपलाईनच काम पुर्ण होऊन १० दिवस झाले तरी रस्ता डांबरीकरण काम पुर्णत्वास आलेलं नसल्याने नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी आक्रमक पवित्रा घेतला. न.प. बांधकाम विभागाचे अधिकारी टेंडर प्रोसेसच्या कामात व्यस्त असल्याने त्यांना जनसामान्यांच्या प्रश्नांच काही…

Read Full News

श्री पिंपळेश्वर गणपती मंदिरात २२ व २३ जानेवारीला माघी गणेश जयंती सोहळा…

⚡बांदा ता.१६-: बांदा येथिल श्री पिंपळेश्वर गणपती मंदिरात गुरुवार दिनांक २२ व शुक्रवार दिनांक २३ जानेवारी रोजी माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.गुरुवारी पहाटे ५ वाजता काकड आरती, अभिषेक व पुजा, सकाळी ९ वाजता श्री गणेश पूजा, श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी १ वाजता…

Read Full News

मित्रपक्षाने तयारी न दर्शविल्यास जि.प. व पं. स. निवडणुकीत स्वबळावर लढू…

मालवण तालुका काँग्रेसच्या बैठकीत सर्वानुमते निर्धार. ⚡मालवण ता.१५-:मित्र पक्ष सोबत असून वरिष्ठ पातळीवर महाविकास आघाडी असल्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसला योग्य तो मानसन्मान मिळावा तसेच जागा वाटपात काँग्रेसच्या उमेदवारांना हव्या असलेल्या जागांमध्ये प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी करतानाच यासाठी मित्र पक्षाने तयारी न दर्शविल्यास स्वबळावर लढूया, असा निर्धार मालवण तालुका राष्ट्रीय काँग्रेस…

Read Full News

नारायण राणे यांच्या रॅलीमध्ये अडथळा आणल्या प्रकरणी संदेश पारकर यांचें सह १० जण निर्दोष…

⚡देवगड ता.१५-:दिनांक २८ जानेवारी २०२१ रोजी देवगड शहरात तत्कालीन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या काढण्यात आलेल्या भाजप जन आशीर्वाद यात्रा या रॅलीदरम्यान जमाव करून, घोषणा देवून, दगडफेक करून अडथळा आणल्याप्रकरणी कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्यासह १० जणांची देवगड प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री एस.एस. पचंडी यांनी सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्तता केली आहे.याकामी देवगड येथील अँड कौस्तुभ…

Read Full News

अणसूर दुर्घटना :संशयितास 5 दिवसांची पोलीस कोठडी…

⚡वेंगुर्ला ता.१५-: वेंगुर्ला तालुक्यातील अणसूर मडकीलवाडी येथे मुलाने घराच्या छपरावर चढून हातातील बंदुकीने अंगणात बसलेल्या आपल्या आईवर बंदुकीने गोळी झाडल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. या भयंकर घटनेने अणसूर गावासाह वेंगुर्ला तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.उमेश सरमळकर (वय 40 रा. अणसूर) असे संशयिताचे नाव असून दाखल फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केल्यावर वेंगुर्ला पोलिसांनी त्यास अटक करून कुडाळ…

Read Full News

अर्नाळा बीचवरील राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत सिंधुदुर्गचा डंका…

बांदा/प्रतिनिधीराष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन संघटना व युवा कार्य व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या अंतर्गत कार्यरत स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या खेळो इंडिया योजनेअंतर्गत अर्नाळा बीच विरार येथे संपन्न झालेल्या स्टेअर्स युथ महाराष्ट्र कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत थर्ड डिग्री ब्लॅकबेल्ट कराटे प्रशिक्षक किरण देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २७ विद्यार्थ्यांनी तब्बल ४५ पदके पटकाविली….

Read Full News

आयुर्वेद संशोधक सुमेध जोशी यांना भारत–जपान आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक स्पर्धेत प्रथम क्रमांक…

⚡मालवण ता.१५-:भारत व जपानमधील आघाडीच्या शास्त्रज्ञ आणि तरुण संशोधकांचा सहभाग असलेल्या भारत–जपान आंतरराष्ट्रीय CAFE-PLUS 2025 (Presentation Learning for Young Scholars) या प्रतिष्ठित वैज्ञानिक स्पर्धेत ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद (AIIA), नवी दिल्ली येथील BAMS, MD आणि PhD (शोधार्थी) असलेले सुमेध जोशी यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. सुमेधा हा मालवण येथील रहिवासी आहे. रोख बक्षिस आणि…

Read Full News

शनिवार, रविवारीही ग्रामपंचायती राहणार सुरू…

ओरोस ता १५जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवार १७ आणि रविवार १८ जानेवारी रोजीची सुट्टी रद्द करण्यात आली आहे. उमेदवारांना आवश्यक असलेले दस्तऐवज तत्काळ उपलब्ध व्हावेत, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी आदेश काढले आहे. १६ ते २१ जानेवारी या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. यावेळी इच्छुक उमेदवारांना ग्रामपंचायत मधून…

Read Full News

नामनिर्देशन पत्र भरताना जास्तीत जास्त चार व्यक्तींनाच प्रवेश…

वाहन संख्येवर सुद्धा निर्बंध:सहा. निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केले निर्देश.. ⚡कुडाळ ता.१५-: जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत. दि. १६ जानेवारी ते २१ जानेवारी दरम्यान नामनिर्देशन पत्र भरली जाणार आहेत. त्यासाठी कुडाळचे तहसिदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पाटील यांनी काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. या सूचनांचे सर्वानी पालन करावे असे…

Read Full News

You cannot copy content of this page