भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांचा वाढदिवस उत्साहात साजरा…

⚡सावंतवाडी, ता.२४-:
सावंतवाडी भाजप कार्यालयात भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांनी या प्रसंगी उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

या वेळी पदाधिकाऱ्यांनी महेश सारंग यांना शुभेच्छा देताना म्हटले की, “त्यांच्या सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होवोत, त्यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी,” अशा शब्दांत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

सावंतवाडी मतदारसंघातील विविध पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून वाढदिवसाचा हा कार्यक्रम साजरा केला. वातावरणात आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

You cannot copy content of this page