Headlines

अजितदादांच्या जाण्याने राजकारणात मोठी पोकळी…

नितेश राणे:अजित दादांना मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली.. ⚡कणकवली ता.२८-:तळागाळातील कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने ताकद देणारे अजित दादा आज आपल्यात नाहीत. कार्यकर्त्याला घडवायचे कसे,त्यांना ताकद कशी द्यायची,त्याच्यामागे कसे उभे राहायचे हे अजित दादा पवार यांनी महाराष्ट्राला दाखवले आणि शिकवले.अशा शब्दात मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित…

Read Full News

महाराष्ट्राने गमावला दूरदृष्टीचा लोकनेता…

विशाल परब: अजित पवार यांना वाहिली श्रद्धांजली.. ⚡सावंतवाडी, ता.२८-:महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्यातील जनतेच्या सेवेत सदैव अग्रभागी राहणारे एक कर्तबगार आणि मेहनती व्यक्तिमत्त्व होते. प्रशासकीय कामकाजाची त्यांना सखोल जाण होती. गरीब व वंचित घटकांच्या सक्षमीकरणासाठी त्यांची असलेली तळमळ विशेष उल्लेखनीय होती, अशा शब्दांत भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. बारामती येथे…

Read Full News

“कोलगाव जि.प. व पं.स. महायुतीचा प्रचार शुभारंभ…

अफवांवर विश्वास ठेवू नका: कोलगाव गावच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीला साथ द्या; महेश सारंग यांचे आवाहन.. ⚡सावंतवाडी ता.२८-: कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार महेश सारंग, व कोलगाव पंचायत समितीच्या उमेदवार संध्या हळदणकर यांनी बुधवारी येथील ग्रामदैवत श्री देव कलेश्वर, श्री देवी सातेरी मंदिरात श्रीफळ ठेवत आजपासून प्रचाराचा शुभारंभ केला.यावेळी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू…

Read Full News

अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने कर्तबगार नेत्याला गमावले…

प्रवीण भोसले: अजित पवार यांना वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली.. ⚡सावंतवाडी ता.२८-: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने राज्याने एक कर्तबगार, दूरदृष्टी असलेला नेता गमावला आहे. महाराष्ट्राचे ‘विकास पुरुष’ म्हणून त्यांची ओळख होती, अशा शब्दांत त्यांचे एकेकाळचे सहकारी तसेच कौटुंबिक स्नेही, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाल्याची बातमी…

Read Full News

कणकवली येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणारी महायुतीची प्रचार सभा रद्द…

*उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर शोककळा… ⚡कणकवली ता.२८-:उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाला अपघात होऊन त्यांचा दुःखद मृत्यू झाला. वाईट आणि धक्कादायक घटनेनंतर कणकवली येथे आज 28 जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कणकवली येथे होणाऱ्या महायुतीची प्रचार सभा रद्द करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणारी ही प्रचार सभा रद्द करण्यात आली आहे. अजित…

Read Full News

मालवणात ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रीय काँग्रेस एकमेकांसमोर तर वंचित बहुजन आघाडी प्रथमच निवडणूक रिंगणात..

⚡मालवण ता.२७-:महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणारे ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हे मालवण पंचायत समिती निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. गेल्याच महिन्यात झालेल्या मालवण नगरपालिका निवडणुकीत ठाकरे शिवसेना व राष्ट्रीय काँग्रेस यांनी महाविकास आघाडी करीत निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत पंचायत समिती गटातून तीन ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष निवडणूक लढवीत आहे. मालवण तालुक्यातील…

Read Full News

हा तर महायुतीचा विजय…

तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांची प्रतिक्रिया. ⚡मालवण ता.२७-: आडवली मालडी पंचायत समिती मतदार संघातून भाजपच्या उमेदवार माजी सभापती सौ. सीमा सतीश परुळेकर या बिनविरोध निवडून आल्याने भाजपमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी हा तर भाजप- शिंदे शिवसेना महायुतीचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. आडवली मालडी पंचायत समिती मतदार संघात भाजपच्या सीमा…

Read Full News

पंचायत समिती व जिल्हा परिषदेवर ठाकरे शिवसेनेचा झेंडा फडकणार…

हरी खोबरेकर:माजी आमदार वैभव नाईक आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लढाई देणार.. ⚡मालवण ता.२७-: मालवण तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत माजी आमदार वैभव नाईक आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लढाई देणार आहोत. आमचे उमेदवार ठामपणे पक्षाबरोबर असून मालवण पंचायत समितीवर आणि जिल्हा परिषदेवर ठाकरे शिवसेनेचाच झेंडा फडकणार…

Read Full News

मालवण मध्ये जि.प. ६ जागांसाठी १३ तर पं.स. ११ जागांसाठी २८ उमेदवार रिंगणात…

⚡मालवण ता.२७-:मालवण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सहा जागासाठी होणाऱ्या निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १४ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने १३ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून एका ठिकाणी तिरंगी तर इतर ठिकाणी दुरंगी लढत होत आहे. तर मालवण पंचायत समितीमधील १२ जागांसाठी तब्बल २३ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. यामध्ये…

Read Full News

किनळे ग्रामपंचायत ने दिला निवृत्त शिक्षिकेला झेंडावंदनाचा मान…

⚡सावंतवाडी ता.२७-: ७७ वा प्रजासत्ताक दिन, किनळे ग्रामपंचायत येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी ग्रामपंचायत येथे झेंडावंदन करण्याचा मान सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सुप्रिया जाधव यांना देण्यात आला.यावेळी किनळे सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,कर्मचारीवर्ग ,अंगणवाडी सेविका,आशा सेविका ग्रामस्थ उपस्थित होते.

Read Full News

You cannot copy content of this page