⚡वेंगुर्ला ता.२४-: शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या सागर कवच अभियान 1/ 2026
वेंगुर्ला पोलीस स्थानकाच्या वतीने मंगळवारी सकाळी 6 वाजता राबविण्यास प्रारंभ करण्यात आला. जिल्हा
पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर व अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येत आहे. वेंगुर्ला पोलीस ठाणे हद्दीत कोंडूरा हरिचरणगिरी ते रेडी पोर्ट – तेरेखोल संपूर्ण सागरी भूभागात हे सागर कवच अभियान राबविण्यात येत आहे. सदर अभियान समुद्री भागात, किनारपट्टी भागात तसेच अंतर्गत सुरक्षा विभागासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी नेमण्यात आली आहे. यामध्ये वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर व योगेश राठोड, तसेच पोलीस अंमलदार जयेश सरमळकर, स्वप्निल तांबे, प्रथमेश पालकर,
मनोज परुळेकर , मंगेश जाधव, गजानन देसाई, योगेश मांजरेकर आदी व अन्य पोलीस सहभागी झाले आहेत. तसेच निवती पोलीस स्थानकाच्या वतीने निवती पोलीस ठाणे हद्दीत निवती, मेढा, भोगवे, खवणे, केळूस आदी सागरी भागात हे अभियान राबविण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी माड्याचीवाडी येथे नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली. यावेळी सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, निवती एपीआय भीमसेन गायकवाड, कस्टम अधिकारी, निवती पोलीस स्टेशन स्टाफ, एसडीपीओ स्टाफ आदी सहभागी झाले आहेत.
बुधवार 25 मार्च रोजी सायंकाळी 6 वा. पर्यंत हे अभियान राबविले जाणार आहे.
वेंगुर्ला – निवती पोलीस स्थानकाच्या वतीने सागर कवच अभियानास प्रारंभ…
