कुडाळ : तालुक्यातील नेरूर कांडरीवाडी येथील शेतकरी गोविंद वासुदेव नाईक वय 75 याचे सोमवारी (ता23) सायंकाळी झाडावरून पडून दुःखद निधन झाले.
ते आपल्या घरासमोर शेतात असणाऱ्या झाडावर चढले होते. त्याचवेळी त्यांचा तोल जाऊन पडले आणि दुखःद निधन झाले. नेरूर परिसरात ते काका नाईक नावाने परिचित होते. कॉनबॅकचे कर्मचारी मंगेश नाईक यांचे वडील तर पत्रकार अजय सावंत यांचे सासरे होत. त्यांच्या मागे पत्नी भाऊ मुलगा, मुलगी वहिनी सुना पुतणे पुतणी नातवंडे असा परिवार आहे आज शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गोविंद नाईक यांचे निधन…
