घारपी शाळेत विद्यार्थ्यांनी साकारलेल्या ‘ज्ञानगंगा’ हस्तपुस्तिकेचे दिमाखदार प्रकाशन…
⚡बांदा ता.१५-: घारपी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा, जिद्दीचा आणि कल्पनाशक्तीचा अनोखा आविष्कार ठरलेल्या ‘ज्ञानगंगा’ हस्तपुस्तकेचे प्रकाशन अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडले. शाळेच्या प्रांगणात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, पालकांचा अभिमान आणि शिक्षकांची समाधानाची भावना या सोहळ्याला विशेष अर्थ देणारी ठरली.विद्यार्थ्यांतील सुप्त गुणांना योग्य व्यासपीठ मिळावे, त्यांच्या लेखनकौशल्याला…
