वेतोरे देऊळवाडी येथील वृद्धाचा आकस्मिक मृत्यू…

⚡वेंगुर्ला ता.०८-: तालुक्यातील वेतोरे
देऊळवाडी येथील रहिवासी (सेवानिवृत्त वायरमन ) विष्णू विश्राम कांबळी ( वय 75) हे आज बुधवार 8 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास पोस्ट ऑफिस मधून घरी जात असताना त्यांना अचानक चक्कर आल्याने त्यांना उपचारासाठी वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. दरम्यान वेंगुर्ला पोलिसांनी पंचनामा केल्यावर रात्री तुळस प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शवविच्छेदन करण्यात आले.
त्यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. याबाबतची खबर रमेश रामचंद्र राऊळ, वेतोरे यांनी वेंगुर्ला पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार योगेश सराफदार हे करीत आहेत.यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, चार मुली असा परिवार आहे.

You cannot copy content of this page