⚡बांदा ता.०८-:
क्रीडा क्षेत्राकडे केवळ मनोरंजन म्हणून न पाहता एक करिअर म्हणून पहा. आज क्रीडा क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. ग्रामीण भागातून राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर चमकणारे खेळाडू निर्माण व्हावेत, हाच या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे, असे प्रतिपादन जि प अध्यक्ष प्रमोद कामत यांनी केले.
बांदा येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘खासदार नारायण राणे चषक’ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत, सावंतवाडी सभापती जाधव, बांदा सरपंच प्रियांका नाईक, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, उप सरपंच रत्नाकर आगलावे, युवा मोर्चा सरचिटणीस जावेद खतीब, माजी उप सरपंच बाळू सावंत, बांदा मंडळ अध्यक्ष मधुकर देसाई, युवा उद्योजक नितीन सावंत, शिवसेना शहर अध्यक्ष ज्ञानेश्वर सावंत, गुरुनाथ सावंत, बाळा आकेरकर, संदीप बांदेकर, हुसेन मकानदार, दादू कविटकर, भाऊ वळंजू, राजेश विरनोडकर, सुनील धामापूरकर, निलेश नाटेकर, उदय धुरी, कैलास गवस, साई धारगळकर, डिंगणे सरपंच संजय डिंगणेकर, डेगवे सरपंच राजन देसाई, संजय पिळणकर, प्रीतम हरमलकर, अभय नाईक आदीसह क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.
प्रभाकर सावंत म्हणाले, सध्याच्या काळात खेळाडूंना प्रसिद्धी व पैसा मिळतो. युवकांनी व्यवसायिक दृष्टिकोन ठेऊन खेळावे.
उद्घाटनानंतर झालेल्या पहिल्या सामन्यात खेळाडूंनी मोठा उत्साह दाखवला. यावेळी भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चषकावर नाव कोरण्यासाठी जिल्ह्यातील अनेक नामांकित संघ या स्पर्धेत आपला कस लावणार आहेत.
