Headlines

कुणकेश्वर मंदिर महाशिवरात्री यात्रेसाठी विशेष वाहतूक आराखडा…

⚡देवगड ता.१४-: श्री क्षेत्र कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रोत्सवानिमित्त १४ ते १७ फेब्रुवारी या कालावधीसाठी कुणकेश्वर देवस्थानकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर वाहतुकीचे सुयोग्य नियोजन पोलीस प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. कुणकेश्वर देवस्थानकडे जाणारे रस्ते हे अरुंद आहेत. यात्रेकरू हे मोठ्या प्रमाणात रस्त्यावरच वाहने पार्क करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता आहे. यात्रा कालावधीत सार्वजनिक वाहतूक सुरळीत राहवी, याकरिता…

Read Full News

कणकवली बसस्थानकातील स्वच्छतागृह बंद…

⚡कणकवली ता.१४-: कणकवली एसटी बसस्थानक परिसरातील स्वच्छतागृहातील अंतर्गत कामानिमित्त स्वच्छतागृह बंद शनिवारी ठेवण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे महिला प्रवाशांची कुंचबना होत आहे.कणकवली एसटी बसस्थानक परिसरात स्वच्छतागृह आहे. कणकवली बसस्थानक हे प्रवाशांच्या वर्दळीचे ठिकाण आहे. नैसर्गिक विधीसाठी प्रवासी स्वच्छतागृहात वापर करतात. मात्र, या गृहातील अंतर्गत दुरुस्तीच्या कामासाठी शनिवारी गृह बंद ठेवण्यात…

Read Full News

मळगाव येथील ज्ञानेश्वर राणे यांच्या निवासस्थानी १९ रोजी शिवजयंती…

राणे यांच्या संकल्पनेतून शिवकालीन ऐतिहासिक प्रतिकृतींचे प्रदर्शन.. ⚡सावंतवाडी ता.१४-: मळगाव–रस्तावाडी येथील शिवभक्त ज्ञानेश्वर गोविंद राणे यांच्या निवासस्थानी मंगळवार, १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव ऐतिहासिक वातावरणात साजरा करण्यात येणार आहे.यंदा या उपक्रमाचे सलग ८ वे वर्ष असून, शिवकालीन इतिहास जपण्याच्या व पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जात आहे. या निमित्ताने राणे यांच्या संकल्पनेतून शिवकालीन…

Read Full News

भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या डी.फार्मसी विभागाला NBA मानांकन…

हा सन्मान मिळवणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलेच महाविद्यालय.. ⚡सावंतवाडी ता.१४-: येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयाने जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. कॉलेजच्या डिप्लोमा इन फार्मसी (D.Pharm) या अभ्यासक्रमाला नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रिडिटेशन (NBA) कडून अधिकृत मानांकन प्राप्त झाले असून हे मानांकन मिळवणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे पहिलेच फार्मसी महाविद्यालय ठरले आहे. या मानांकनाची…

Read Full News

कांदळगाव येथील श्री रामेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सव…

⚡मालवण ता.१४-:कांदळगावचे ग्रामदैवत स्वयंभू श्री देव रामेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त रविवार १५ फेब्रुवारी रोजी विविधी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाशिवरात्री निमित्त मंदिरात सकाळी विधीवत श्री रामेश्वर देवाची पूजाअर्चा, अभिषेक, भाविकांना ग्रामदेवतेचे दर्शन, सायंकाळी ७ वाजता स्थानिक ग्रामस्थ भजनी मंडळाची संगीत भजने, रात्रौ ९. ३० वा. पुराण वाचन कार्यक्रमनंतर श्री देव रामेश्वर यांची मंदिर…

Read Full News

मालवणमध्ये उद्या श्री स्वामी समर्थ पादुकांचे पूजन…

⚡मालवण ता.१४-:श्री स्वामी समर्थ महाराजा मूळस्थान अक्कलकोट येथून श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पादुका मालवण शहरातील अॅड. उल्हास कुळकर्णी यांच्या निवासस्थानी दि. १५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळात आणून त्यांचे पूजन करण्यात येणार आहे. यावेळी श्री वेदमूर्ती नितीन महाराज पुजारी (चोळप्पा महाराज यांचे वंशज) उपस्थित राहणार आहेत. सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन…

Read Full News

दांडी किनाऱ्यावरील स्वच्छतेबाबत महिला व बालकल्याण सभापती सो आचरेकर यांनी वेधले लक्ष…

⚡मालवण ता.१४-:मालवण शहरात पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण गणल्या गेलेल्या मालवण दांडी समुद्र किनाऱ्याच्या स्वच्छतेबाबत मालवण नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती तथा भाजप नगरसेविका सौ अन्वेषा आचरेकर यांनी मालवण नगरपालिकेच्या स्वच्छता व आरोग्य समितीच्या सभापती सौ पूनम चव्हाण यांचे लक्ष वेधल्यानंतर आज सकाळी सौ आचरेकर आणि सौ चव्हाण या द्वयीनी अधिकाऱ्यांसमवेत दांडी समुद्रकिनाऱ्याची पाहणी केली यावेळी…

Read Full News

सावडाव तिठ्यावर अपघात; चार जण जखमी…

⚡कणकवली ता.१४-: मुंबई – गोवा महामार्गावर सावडाव तिठा येथे मुंबई-गोवा लेनवर शनिवारी सकाळी ८.४५ वाजण्याच्या मॅजिक – सुझुकी ब्रेझा कारमध्ये अपघात झाला. या अपघातात चार जण जखमी झाले असून दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जाणारी MH-47 CD 2678 क्रमांकाची सुझुकी ब्रेझा कार (चालक – प्राईम तुषार पराडकर, वय २६, रा….

Read Full News

ओटवणे तिठा येथे मालवाहू ट्रकला अपघात…

⚡सावंतवाडी ता.१४-: आज पहाटे ओटवणे तिठा येथे मालवाहू ट्रक ला अपघात घडला .विलवडे येथील राजा शिवाजी विद्यालय येथे बाजूला ओटवणे तिठा येथे चढावर कोल्हापूर वरून मालवाहू ट्रक मधून लोखंड भरून ते गोव्याच्या दिशेने घेऊन जात असताना ओटवणे तिठा येथील चढावर ट्रक आल्यावर ट्रक चा पुढील भाग वर होऊन ट्रक मधील लोखंड खाली येऊन ट्रक चा…

Read Full News

मुळदेत गावठी बॉम्बच्या स्फोटात एकजण गंभीर जखमी…

जखमीला बांबुळीला हलवले:पोल्ट्री मध्ये बॉम्ब बनवताना झाला स्फोट.. कुडाळ : तालुक्यातील मुळदे तळपवाडी येथील संतोष महादेव मासंग (५०) हे आपल्या घराशेजारील बंद पोल्ट्रीवजा मांगरात गावठी बॉम्ब बनवीत असताना शुक्रवारी सायंकाळी त्या बॉम्बचा स्फोट होऊन त्यात संतोष मासंग हे गंभीर जखमी झाले आहेत.जखमी शेतकऱ्यावर तात्काळ कुडाळ ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे…

Read Full News

You cannot copy content of this page