श्री देव पिंपळेश्वर देवस्थानचा १९ वा वर्धापन दिन उद्या…

धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी..

दोडामार्ग :
संपूर्ण दोडामार्ग शहरवासीयांचे आराध्य दैवत श्री
देव पिंपळेश्वर देवस्थानचा १९ वा वर्धापन दिन उद्या 9 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायण महापूजा चे आयोजन करण्यात आले आहे तर १० वाजता आरती व तीर्थप्रसाद सुरु होईल. दुपारी १२.३० वाजता महाप्रसाद सुरू होईल.

सायंकाळी ५ वाजता शहरातील सावंतवाडा येथील श्री दत्त राष्ट्रोळी भजन मंडळ यांच्या सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम संपन्न होईल. तर रात्री १० वाजता ” ओ काका.. आनी.. आनी नाका ” हे गोव्यातील एक कोकणी नाटक संपन्न होईल. दरवर्षीप्रमाणे आयोजित झालेल्या या वर्धापनदिन कार्यक्रमाला सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन पिंपळेश्वर देवस्थान समिती बाजारपेठ दोडामार्ग यांनी केले आहे.

You cannot copy content of this page