वेंगुर्ला न.प. च्या महिला व बालकल्याण समितीमार्फतभव्य महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन…
⚡वेंगुर्ला ता.०२-: वेंगुर्ला नगरपरिषद महिला व बालकल्याण समिती मार्फत दि.१० मार्च रोजी दुपारी ३ वाजता कॅम्प येथील नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृह येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन २०२६ उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. महिलांच्या सर्वांगीण सशक्तीकरणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करणे तसेच स्त्रीशक्तीच्या सामर्थ्याला व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील…
