मालवण देऊळवाडा येथे चालत्या दुचाकीला आग लागल्याने खळबळ…

⚡मालवण ता.२६-:
मालवण शहरातील देऊळवाडा भागातील रस्त्यावर आज दुपारी अडीज वाजण्याच्या सुमारास चालत्या टीव्हीएस विगो दुचाकीने मागच्या बाजूने अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. दुचाकीने पेट घेतल्याचा प्रकार दुचाकीच्या मागून येणाऱ्या दुचाकीस्वाराच्या ही घटना दृष्टीपतास पडताच त्याने वेळीच गाडी थांबवून स्थानिक नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला अथक परिश्रमांनतर आग आटोक्यात आली मात्र, दुचाकी जळाल्याने दुचाकीचे मोठे नुकसान झाले, सुदैवाने दुचाकी चालकास कोणतीही दुखापत झाली नाही.

मालवण देऊळवाडा रस्त्यावरून दुपारी एक दुचाकी चालक त्याच्या ताब्यातील टीव्हीएस कंपनीची विगो दुचाकी घेऊन जात असताना दुचाकीच्या मागील बाजूस अचानक आग लागली. ही आग मागील बाजूने येणाऱ्या दुचाकी चालकाच्या लक्षात येताच त्याने त्वरित दुचाकी चालकास सांगितल्याने त्याने दुचाकी थांबवली. ही आग वाढतच जाऊन दुचाकीचा मागील भाग व सीटचा भाग अगीच्या भक्ष्यस्थानी पडला. यावेळी स्थानिक नागरिकांनी पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग विझेपर्यंत दुचाकीचे बरेच नुकसान झाले होते. ही आग दुचाकीच्या मागील बाजूस असलेल्या पेट्रोलच्या टाकीला लागल्याचा प्राथमिक अंदाज उपस्थितांनी व्यक्त केला.

You cannot copy content of this page