सावंतवाडी : सावंतवाडी तालुका संस्कृत भारती समिती व सावंतवाडी वेदशास्त्र संस्कृत पाठशाळा आणि कळसुलकर इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने कळसुलकर इंग्लिश स्कूल,सावंतवाडी येथे शनिवारी २५ एप्रिलपासून वासंतिक वर्गास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. हा वर्ग बुधवार २९ एप्रिलपर्यंत चालणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर सावंतवाडी विकास खंड मुख्य संयोजक नेहा पुराणिक, संस्थेचे सचिव प्रसाद नार्वेकर, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दत्तप्रसाद गोठोसकर, वासंतिक वर्गाच्या प्रमुख मार्गदर्शक दुहिता साखळकर-देशपांडे, मुख्याधापक सूर्यकांत भुरे सर उपस्थित होते. कळसुलकर इंग्लिश स्कूल, सावंतवाडी येथे पाच दिवशीय हा वासंतिक वर्ग सकाळी ९ ते १०. ३० या वेळेत दररोज दिड तास सुरू राहणार आहे. या पाच दिवशिय वासंतिक वर्गात प्रमुख मार्गदर्शक दुहिता साखळकर देशपांडे (एमए संस्कृत, बीए संस्कृत) विद्यार्थ्यांना संस्कृत विषयी काही अतिशय उपयुक्त स्तोत्रे व सुभाषिते यांची माहिती देऊन मार्गदर्शन करणार आहेत. तसेच वासंतिक वर्ग पुस्तिकेचे पूर्ण पाठांतर करण्यात येणार आहे. प्रास्ताविक जी. एस. सावंत, सूत्रसंचालन अनिल ठाकर तर आभार एम. एम. कदम यांनी मानले.
कळसुलकर इंग्लिश स्कूल यथे संस्कृत वासंतिक वर्गास प्रारंभ…
