⚡वेंगुर्ला ता.२७-: वेंगुर्लाहून मठमार्गे कुडाळ येथे जात असताना मठ ठाकूरवाडी येथील वळणावर साईडपट्टीनजिक मातीवर घसरून कोचरा येथील एक ज्येष्ठ इसम जखमी झाले आहेत. याबाबत माहिती मिळताच मठ येथील ग्रामस्थांनी त्यांना आडेली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले आहे.आडेली वैद्यकीय अधिकारी डॉ. संजीवनी पाटील, डॉ. अश्विनी माईणकर यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. दरम्यान मठ एरियातील साईडपट्टी धोकादायक बनत असल्याने स्थानिक ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष न पूरविल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
मठ ठाकूरवाडी येथे दुचाकी घसरून कोचरा येथील इसम जखमी…
