तसेच “पंढरीचा पहिला वारकरी ” दशावतारी नाटकाचेही आयोजन..
⚡सावंतवाडी ता.२७-: श्री कुलदेवता युवक कला, क्रीडा मंडळ मळेवाड, आयोजित प्रतिवर्षीप्रमाणे शुक्रवार दि. १ मे रोजी सकाळी ११ वाजता.श्री कुलदेवता मंदिर, मळेवाड – देऊळवाडी येथे ” श्री सत्यनारायण महापूजा ” आयोजित करण्यात आली आहे.
यानिमित्त सकाळी ११ वा. नामवंत कलाकारांनी रेखाटलेली आकर्षक भव्य खुली “रांगोळी स्पर्धा व प्रदर्शना “चे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे प्रथम बक्षीस रोख रु. ५,०००/- व सन्मानचिन्ह,द्वितीय बक्षीस रोख रु. ३,०००/- तृतीय बक्षीस रोख रु. २,०००/- व सन्मानचिन्ह तसेच उत्तेजनार्थ (प्रथम) रोख रु. १,०००/- व सन्मानचिन्ह, (द्वितीय) रोख रु. १,०००/- व सन्मानचिन्ह
तसेच यानिमित्त सायं. ६.३० वाजता अमृतनाथ दशावतारी नाट्यमंडळ, म्हापण-वेंगुर्ला प्रस्तुत “पंढरीचा पहिला वारकरी” हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री कुलदेवता युवक कला क्रीडा मंडळ मळेवाड व ग्रामस्थांनी केले आहे.
