⚡सावंतवाडी ता.२७-: श्री देव काळोबा मित्रमंडळ वसवाचे- तळे यांच्या वतीने आज सोमवार दि.२७ एप्रिल रोजी रात्रौ ठिक ७.०० वाजता ,धाकोरे वसवाचे तळे शाळेसमोरील मैदानावर ,पार्सेकर पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ,उभादांडा, वेंगुर्ला यांचा “युगे युगे कलियुगे” हा दशावतार नाट्य प्रयोग होणार आहे .तरी सर्व नाट्य रसिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री देव काळोबा मित्रमंडळ धाकोरे वसवाचे- तळे व ग्रामस्थांनी केले आहे.
धाकोरे येथे आज “युगे युगे कलियुगे” नाटकाचे आयोजन..
