चाफेड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी साहिल पांचाळ यांची बिनविरोध निवड…

पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केले अभिनंदन:’गावच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्यास कटिबद्ध’; ना. नितेश राणेंनी दिला विकासाचा विश्‍वास..

कणकवली : देवगड तालुक्यातील चाफेड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी साहिल पांचाळ यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीनंतर नवनिर्वाचित सरपंच साहिल पांचाळ यांनी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांची सदिच्छा भेट घेतली.

या भेटीदरम्यान पालकमंत्री नितेश राणे यांनी सरपंच साहिल पांचाळ यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी संवाद साधताना, “चाफेड गावच्या सर्वांगीण विकासासाठी जी काही मदत लागेल, ती उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत,” असा ठाम विश्वास ना. नितेश राणे यांनी सरपंच व ग्रामस्थांना दिला.

यावेळी जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, मिलिंद साटम, राजू शेटये, अमित साटम, चंद्रकांत साटम आदी प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

साहिल पांचाळ यांच्या या बिनविरोध निवडीमुळे चाफेड गावातील राजकीय वर्तुळातून व ग्रामस्थांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.

You cannot copy content of this page