⚡सावंतवाडी ता.२६-: आजगाव येथे आयोजित शूटिंगबॉल प्रीमियर लीग स्पर्धेचे उद्घाटन शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढून उत्साहात उद्घाटन करण्यात आले. यावेळी मंडळाच्या वतीने संजू परब यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना परब म्हणाले की, क्रिकेटप्रमाणे शूटिंगबॉलसारख्या खेळालाही प्रोत्साहन देण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन करणे अत्यंत कौतुकास्पद आहे. युवकांना विविध खेळांमध्ये संधी मिळावी यासाठी मंडळाचा हा उपक्रम अभिनंदनीय असून भविष्यातही अशा स्पर्धा सातत्याने आयोजित कराव्यात. मंडळाला माझ्याकडून नेहमीच सहकार्य राहील, असे आश्वासनही त्यांनी दिले.
या कार्यक्रमास मळेवाड पंचायत समिती सदस्य धनश्री मराठे, हेमंत मराठे, अमित प्रभू, सचिन प्रभू यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
