Headlines

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत बुरंबावडे महिला संघ विजेता…

२५ संघांचा समावेश: मुंबई येथील स्पर्धेसाठी निवड.. ओरोस ता १कोरो इंडिया व विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या महिला, ट्रान्स महिला आणि युवतींच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील शिवशक्ती कबड्डी संघ, बुरंबावडे या संघाने देदीप्यमान यश संपादन केले आहे. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यांमध्ये प्रतिस्पर्धी संघांना धूळ चारत या संघाने प्रथम…

Read Full News

कणकवलीत शिष्यवृत्ती सराव परीक्षेतील गुणवंतांचा सन्मान…

कणकवली : प. पू. भालचंद्र महाराज संस्थान हे धार्मिक क्षेत्रासह आरोग्य व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे संस्थान म्हणून परिचित आहे. संस्थानाच्या शैक्षणिक मंडळातर्फे गेली तब्बल ४५ वर्षे शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग व सराव परीक्षा सातत्याने घेतली जात असून, या परीक्षेत सहभागी झालेले विद्यार्थी शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेतही अव्वल क्रमांक पटकावत आहेत. ही बाब संस्थानासाठी अभिमानास्पद असल्याचे…

Read Full News

‘गुरू तेग बहादूर’ निबंध स्पर्धेत सुनील नातू यांना तृतीय क्रमांक…

⚡बांदा ता.0१-: ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाच्या अनुषंगाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या उपसंचालक (माहिती), विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर यांच्या वतीने नुकतीच ‘गुरू तेग बहादूर यांचे जीवनकार्य’ या विषयावर खुली निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत बांदा नट वाचनालयचे सहाय्यक ग्रंथपाल सुनील नातू यांनी उत्कृष्ट निबंध लेखन…

Read Full News

नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘खासदार चषक’ क्रिकेट स्पर्धा…

८ ते १२ एप्रिल दरम्यान बांद्यात रंगणार सामने.. ⚡बांदा ता.०१-: खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त बांदा येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘खासदार नारायण राणे चषक’ ही क्रिकेट स्पर्धा दिनांक ८ एप्रिल ते १२ एप्रिल या कालावधीत बांदा येथील पाटेश्वर मैदानावर खेळविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली.या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रुपये…

Read Full News

वि. वा. शिरवाडकर जयंतीनिमित्त बांदा नट वाचनालयात मराठी भाषा गौरवदिन उत्साहात साजरा…

⚡बांदा ता.०१-: मराठी मातृभाषेचा गौरव जपण्यासाठी थोर साहित्यिक वि. वा. शिरवाडकर तथा कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त बांदा नट वाचनालयात मराठी भाषा गौरवदिन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत होते. यावेळी सेक्रेटरी राकेश केसरकर, सदस्य प्रकाश पाणदरे, अनंत भाटे, गुरुनाथ नार्वेकर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात…

Read Full News

बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलमध्ये लॉर्ड बेडन पॉवेल चिंतन दिवस उत्साहात…

⚡कुडाळ ता.०१-: स्काऊट गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांचा 22 फेब्रुवारी हा जन्मदिवस ‘चिंतन दिवस’ म्हणुन जगभरात साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून येथील बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूलमध्ये भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सकाळच्या सत्रामध्ये शालेय परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी कब-बुलबुल, स्काऊट गाईड यांच्या वतीने ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर मुख्य…

Read Full News

पाट हायस्कूलमध्ये ज्ञानज्योती शिष्यवृत्तधारकाचा सन्मान…

⚡कुडाळ ता.०१-: एस के पाटील शिक्षण प्रसारक मंडळ, पाट संचलित एस. एल. देसाई विद्यालय आणि कै. सो. सि. रा. पाटील कनिष्ठ महाविद्यालय,पाट येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी ग्लोबल फाउंडेशन, पिंगुळी-कुडाळ यांच्या वतीने शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.ग्रामीण भागातील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन व आर्थिक आधार मिळावा या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्लोबल फाउंडेशनतर्फे पाच विद्यार्थ्यांना प्रत्येकी…

Read Full News

मनसे कडून आमदार निलेश राणे यांना धन्यवाद…

विधिमंडळात आम. निलेश राणे उपस्थित केले कोकणातील ज्वलंत प्रश्न:कोकणवासियांनी रस्त्यावर उतरण्याची गरज;कुणाल किनळेकर.. ⚡कुडाळ ता.०१-: महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात कोकणातील ज्वलंत प्रश्न उपस्थित केल्याबद्दल आमदार निलेश राणे यांचे मनसे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी आभार मानले आहेत. निष्क्रिय सरकारला जाग आणण्यासाठी सर्व कोकणवासीयांनी रस्त्यावर उतरण्याची गरज असल्याचे कुणाल किनळेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.प्रसिद्धी पत्रकात…

Read Full News

विरनोडकर कथाकथन स्पर्धेत लहान गटात स्वरांग गावडे, मोठ्या गटात गार्गी गुंजाळ प्रथम…

सावंतवाडी : येथील श्रीराम वाचन मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या विरनोडकर कथाकथन स्पर्धेत लहान गटात सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीची कु. स्वरांग गावडे, तर मोठ्या गटात याच प्रशालेची कु. गार्गी गुंजाळ यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त थोर कवी, नाटककार व कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीचे औचित्य साधत श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी यांच्या…

Read Full News

डॉ.श्री.धर्माधिकारी प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम..

प्रतिष्ठानच्या वतीने शिरोडा वेळागर येथे स्वच्छता अभियान.. ⚡सावंतवाडी ता.०१-:डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा (ता.अलिबाग) यांच्या सौजन्याने डॉ नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने १ मार्च रोजी संपूर्ण देशभर स्वच्छता अभियान राबविले जाते. याचाच एक भाग म्हणून शिरोडा वेळागर समुद्रकिनारी परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले.यावेळी शिरोडा सरपंच लतिका रेडकर,माजी उपसभापती सिद्धेश परब,नूतन जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ,…

Read Full News

You cannot copy content of this page