दशकांपासूनची ग्रामस्थांची मागणी अखेर पूर्ण..
⚡बांदा ता.२६-: डेगवे ते तांबोळी दरम्यानचा फॉरेस्ट रस्ता अखेर मार्गी लागला असून या रस्त्याचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. गेल्या अनेक दशकांपासून ग्रामस्थांची असलेली ही मागणी पूर्ण होत असल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे.
सुमारे 300 मीटर लांबीचा हा रस्ता डेगवे, तांबोळी, असनिये, घारपी, भालावल आदी दहा गावांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या रस्त्यामुळे ग्रामीण भागातील दळणवळण सुलभ होणार असून शेती, शिक्षण व दैनंदिन व्यवहारासाठी मोठी मदत मिळणार आहे. वनखात्याच्या परवानगीअभावी हा रस्ता अनेक वर्षे प्रलंबित होता. मात्र पाठपुराव्यानंतर अखेर या कामाला मंजुरी मिळाली.
माजी शिक्षण मंत्री व आमदार दीपकभाई केसरकर यांनी आमदार निधीतून 15 लाख रुपयांची तरतूद करून या कामाला गती दिली आहे. त्यामुळे अनेक वर्षे रखडलेला हा प्रश्न मार्गी लागला आहे.
भूमिपूजन कार्यक्रमाला माजी शिक्षण मंत्री व आमदार दीपकभाई केसरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोदभाई कामत, पंचायत समिती सभापती सुस्मिता जाधव, शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, पंचायत समिती सदस्य महेश धुरी, प्रियांका देसाई, बांदा मंडल प्रभारी अध्यक्ष मधुकर देसाई, बांदा मंडल उपाध्यक्ष गुरु कल्याणकर, सरपंच वेदिका नाईक, राजन देसाई, उपसरपंच मंगेश देसाई, जगदीश सावंत, ग्रामपंचायत सदस्य राजेश देसाई, प्रगती देसाई, रूपाली देसाई, माजी सरपंच मंगलदास देसाई, माजी सभापती भगवानराव देसाई, सोसायटी चेअरमन प्रवीण देसाई, तांबोळी माजी सरपंच अभिलाष देसाई, राजेश विरनोडकर, वाफोली उपसरपंच विनेश गवस, सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघ संचालक राजन रेडकर, मिलिंद देसाई, नारायण राणे, माजी उपसभापती विनायक दळवी, सुशांत पांगम, शरद सावंत, दत्तात्रय देसाई, कैलास गवस, बाबू सावंत, परेश देसाई तसेच डेगवे, तांबोळी, असनिये, घारपी, भालावल येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या रस्त्यामुळे परिसरातील वाहतूक सुलभ होऊन ग्रामस्थांची दीर्घकाळची गैरसोय दूर होणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
