सावंतवाडीत जिल्हास्तरीय खुल्या एकेरी कॅरम स्पर्धा…

कुडाळ : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पुरस्कृत आणि सावंतवाडी नगरपरिषद पर्यटन आणि उद्यान सभापती सौ. मोहिनी सुरेंद्र मडगावकर यांच्या संकल्पनेतून तसेच सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने जिल्हास्तरीय खुल्या एकेरी कॅरम स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, रविवार दि. २ व ३ मे २०२६ रोजी सावंतवाडीच्या सचिन घाडी मित्रमंडळाने या स्पर्धेचे आयोजन केले असून काझी शहाबुद्दीन हॉल, सावंतवाडी येथे हि स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत जास्तीतजास्त संख्यने स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
या स्पर्धत पहिल्या ८ क्रमांकांना रोख रकमेची बक्षिसे व पहिल्या ३ क्रमांकाना आकर्षक चषक देण्यात येतील. व्हाईट स्लॅम / ब्लॅक स्लॅमला आकर्षक बक्षिसे आहेत. जिल्ह्याचे नाव व लोगो असलेला पांढरा टी शर्ट आणि फूल पॅन्ट घालून खेळणे अनिवार्य आहे. ह्या स्पर्धेसाठी सहभागी सर्व स्पर्धकांना असोसिएशन कडून मोफत गणवेश देण्यात येणार आहे. स्पर्धा एकाच खुल्या गटात खेळविण्यात येईल.
खेळाडू नोंदणी फी रु. १०० /- व प्रवेश फी रु. १५० /- सहीत आपली नावे द्यायची आहेत. स्पर्धेसाठी नावे नोंदविण्याची अंतिम मुदत गुरुवार दि. ३०एप्रिल २०२६ हि आहे. स्पर्धकांनी आपली नावे सावंतवाडी – विधनाथ ( गोट्या ) सावंत (9420646945), कुडाळ – शुक्राचार्य म्हाडेश्वर (9421238518), वेंगुर्ला – ओंकार कुबल (7276523372), कणकवली – अनिल कम्मार (9370588308), देवगड – प्रकाश प्रभू (9423303822), मालवण – संतोष बनसोडे (9423302707) यांच्यकडे द्यायची आहेत.
जास्तीत जास्त स्पर्धकांनी ह्या स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अवधूत भणगे व भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका मोहिनी मडगावकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page